Pune Crime : धक्कादायक! कोयता गँगमधील चार अल्पवीयन मुलांचे बालनिरीक्षणगृहातून पलायन

Pune Crime : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोयता गँगची दहशत दिसून येत होती. या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या काही मुलांना पुण्यातील येरवड्याच्या बाल निरीक्षणगृहात ठेवण्यात आले होते. या पुण्यातील पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्राच्या बाल निरीक्षण गृह याठिकाणी असलेल्या काही तरुणांनी पलायन केले आहे.

यामध्ये इम्रान शेख, अमन तिवारी, गौस कुरेशी, सुमित चंदमनीराम अशी या तरुणांची नावे आहेत. निरीक्षण गृहाची खिडकी फोडून शिडी लावून या मुलांनी पलायन केलं आहे. आरोपींना वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये अटक केले असून बालसुधारगृहांमध्ये ठेवण्यात आले होते.

शहरातील विविध गुन्हांचे आरोपी असलेले हे तरुण अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी येरवाड्याच्या बाल निरीक्षणगृहात केली जाते.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी या बाल निरीक्षणगृहात या तरुणांची आपापसात भांडण झाली यावेळी काही तरुणांनी तिथे असलेली खिडकी फोडली आणि या गोंधळाचा फायदा घेऊन त्या ठिकाणी असलेल्या एका खोलीतून शिडी आणून खिडकीला लावली आणि तिथून या चार जणांनी पळ काढला आहे.

फेब्रुवारी महिन्यात सुद्धा या ठिकाणी असलेल्या ७ जणांनी पोलिसांच्या हातावर तुरी देत पळ काढला होता.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply