Pune : धक्कादायक! अनैतिक संबंधातून जन्मलेल्या बाळाला रुग्णालयाच्या खिडकीतून फेकले, गुन्हा दाखल

Pune Crime : पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका आईनेच आपल्या नवजात बालकाला क्रूरपणे रुग्णालयाच्या खिडकीतून बाहेर फेकून दिल्याची घटना घडली आहे. हे बाळ अनैतिक संबंधातून जन्माला आल्याने या क्रूर आईने हे कृत्य केलं असल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकरणी 19 वर्षीय तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनैतिक संबंधातून ही 19 वर्षीय तरुणी गर्भवती राहिली होती. त्यानंतर ती पाठीच्या दुखण्याचे आजार सांगून रुग्णालयात दाखल झाली. त्यानंतर तिने एका बाळाला जन्म दिला. याविषयी कोणाला काही एक न सांगता हे बाळ तिने रुग्णालयाच्या खिडकीतून खाली फेकून दिले. 

हा संपूर्ण प्रकार शनिवारी नऱ्हे येथील काशीबाई नवले रुग्णालयात घडला आहे. याप्रकरणी 19 वर्षे तरुणीवर सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

शनिवारी सकाळी ती नवले रुग्णालयातील कॅज्युअलटी वार्ड शेजारी असणाऱ्या एका स्वच्छतागृहात गेली. तिथे तिने एका बाळाला जन्म दिला आणि काहीही विचार न करता तिने हे बाळ खिडकीतून बाहेर फेकून दिले. या संपूर्ण घटनेत या नवजात बाळाचा मृत्यू झाला.

हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यानंतर रुग्णालयाच्या वतीने या प्रकरणी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सध्या या तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सिंहगड रस्ता पोलीस अधिक तपास करत आहेत.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply