Pune : वर्गातच मित्राचा गळा चिरला; विद्यार्थ्याचा मृत्यू, पुण्यातील क्लासेसमध्ये रक्तरंजित थरार

Pune : पुण्यातल्या राजगुरूनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. खासगी कोचिंग क्लासेसमध्ये रक्तरंजित थरार झालाय. या क्लासेसमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने मित्रावर चाकूहल्ला केला. शिक्षक शिकवत असताना हा भयंकर प्रकार घडला. या विद्यार्थ्याने चाकूने मित्राचा गळा चिरला. या हल्ल्यात विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, राजगुरुनगर येथे सकाळी एका खासगी कोचिंग क्लासमध्ये ही घटना घडली. एका विद्यार्थ्याने क्लासमध्येच मित्रावर जीवघेणा हल्ला केला. शिक्षक शिकवत असताना अचानक हा मुलगा उठला त्याने सोबत आणलेला चाकू बॅगेतून काढला आणि मित्रावर सपासप वार करू लागला. या मुलाने मित्राचा गळा चिरला.

Maharashtra Elections : मोठी बातमी! महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता लागू होणार? महापालिका निवडणुकांच्या घोषणेची आयोगाकडून शक्यता

क्लास सुरू असताना ही हल्ल्याची घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली. सर्व विद्यार्थी प्रचंड घाबरले. मित्रावर हल्ला करून आरोपी मुलगा दुचाकीवरून पळून गेला. हा हल्ला का करण्यात आला यामागचे कारण अस्पष्ट आहे. घटनेची माहिती मिळताच राजगुरूनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेमुळे खासगी क्लासेसमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *