Pune Crime : पुण्यात सायबर फसवणूक, शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावाखाली दोघांची ४१ लाखांची फसवणूक

Pune Crime : घोरपडे पेठेतील ३७ वर्षीय महिला आणि पाषाणमधील ४४ वर्षीय व्यक्तीला सायबर चोरट्यांनी तब्बल ४१ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी मुंढवा आणि बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याबाबत घोरपडे पेठेतील एका ३७ वर्षीय महिलेने मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पहिल्या घटनेत घोरपडे पेठेतील महिलेने मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. सायबर चोरट्यांनी शेअर बाजारात मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून तिचा विश्वास जिंकला. डिसेंबर ते जानेवारी या काळात, वेगवेगळ्या वेळेस महिलेकडून २३ लाख ५० हजार रुपये बँक खात्यात जमा करण्यास भाग पाडण्यात आले. मात्र, परतावा मागितल्यानंतर पैसे न मिळाल्याने महिलेला फसवणुकीची जाणीव झाली.

Pune : पुण्यातील कसबा मतदारसंघापासून इंदूर पॅटर्नची होणार सुरुवात, पुणे महापालिकेचे आयुक्त थेट इंदूरमध्ये

दुसऱ्या घटनेत पाषाणमधील एका व्यक्तीला सायबर चोरट्यांनी सप्टेंबरमध्ये मोबाईलवर लिंक पाठवून अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. गुंतवणुकीवर आकर्षक परतावा मिळेल, असा संदेश देऊन त्यांनी सुरुवातीला थोडा परतावा देत व्यक्तीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर, या व्यक्तीकडून १७ लाख ७४ हजार रुपयांची गुंतवणूक करवून घेतली. मात्र, यावर कोणताही परतावा न देता आर्थिक फसवणूक करण्यात आली.

सायबर पोलीस या दोन्ही प्रकरणांचा तपास करत असून, चोरट्यांचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नका, तसेच कोणतीही लिंक डाऊनलोड करताना विशेष काळजी घ्यावी, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. या घटनांमुळे नागरिकांनी सायबर सुरक्षेच्या बाबतीत सतर्क राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे. आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी जागरूकता आणि सतर्कता अत्यंत महत्त्वाची आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply