Pune Crime : पुण्यात रक्षकच झाला भक्षक! ड्युटीवर असणाऱ्या पोलिसानं ५ वर्षांच्या चिमुकलीवर केला लैंगिक अत्याचार

Pune Maval Crime News : पुण्यातून हादरवणारी घटना समोर आली आहे. ड्युटीवर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यानेच पाच वर्षांच्या चिमुकलीवर लैगिंक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मावळमधील विसापूर किल्ला परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी आरोपी पोलिसांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पुण्यात रक्षच भक्षक झाल्यामुळे पुन्हा एकदा कायदा सुवस्थेवर प्रश्न निर्माण झालाय. या प्रकरणानंतर मावळ आणि पुण्यामध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. आरोपी पोलिसावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

मावळमधील विसापूर किल्ला परिसरात आई-वडिलांसोबत दुकानात असलेल्या पाच वर्षाच्या चिमुकलीवर बंदोबस्तावर असलेल्या पोलिसाने लैंगिक अत्याचार केला. मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून आडोशाला नेऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी संबंधित पोलिसाला अटक केली आहे. सचिन वसंत सस्ते असे अटक केलेल्या आरोपी पोलिसाचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Maharashtra Weather Update : थंडी गायब! राज्यात गारपिटीसह पावसाची शक्यता, यलो अलर्ट जारी

नाताळनिमित्त मावळ तालुक्यातील पर्यटन स्थळांवर पोलिसांकडून अधिकचा बंदोबस्त लावण्यात आला होता. पर्यटन स्थळावर सुट्टीच्या अनुषंगाने लोक फिरण्यासाठी येतात. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला होता. पण हाच रक्षक विसापूरमध्ये भक्षक झाला. यामुळे एकच संताप व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसानी आरोपी पोलिसाला तक्रारीनंतर बेड्या ठोकल्या असून अधिकचा तपास सुरू केला आहे.

लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या विसापूर किल्ल्यावर पुणे ग्रामीण मुख्यालय येथून अधिकचा बंदोबस्त मागवण्यात आला होता. त्यामध्ये पोलीस सचिन सस्ते हा देखील विसापूर किल्ला परिसरात बंदोबस्तावर होता. विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी या पीडित मुलीच्या आईवडिलांची टपरी आहे. तिथे मुलगी खेळत होती. त्या चिमुकलीला सचिन सस्ते याने चॉकलेटचा आमिष दाखवले आणि आडोशाला नेले. तिथे तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार मुलीने आपल्या पालकांना सांगितला. पालकांनी तात्काळ पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल केला. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी पोलीस सचिन सस्ते याला अटक केली आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply