Pune News : भाचीला घरात एकटं बघताच मामाची नियत फिरली; पुण्याला हादरवून टाकणारी घटना

Pune Crime News : पुण्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने महिला तसेच अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वी शहरात एका स्कूलबस चालकाने दोन शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार केला होता. ही घटना ताजी असतानाच घोरपडी परिसरात अशाच प्रकारची एक संतापजनक घटना घडली. एका नराधम मामानेच ४ वर्षीय भाचीच्या शरीराचे लचके तोडले. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.

गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा कसून शोध घेतला जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित ४ वर्षीय चिमुकली आपल्या आईसोबत घोरपडी गावातील एका झोपडपट्टी परिसरात राहते. आरोपी आणि मुलीच्या आई वडिलांची गेल्या सात ते आठ वर्षांपासून ओळख आहे.

त्यामुळे त्याचे पीडितेच्या घरी येणे जाणे सुरु होते. पीडितेला तसेच तिच्या बहिणीला आरोपी नेहमी खाऊ देण्यासाठी बाहेर घेऊन जात असे. रविवारी सकाळी आरोपी पुन्हा पीडितेच्या घरी आला. यावेळी तिची आई घरात नव्हती. पीडितेला एकटं पाहून आरोपीची नियत फिरली. तो तिला कडेवर उचलून घेऊन गेला.

Pune : महिलांवरील अत्याचाराच्या घटनांचा निषेध, पुण्यात शरद पवार गटाकडून तीन तोंडी रावणाचे दहन

 

खूप उशीर झाला तरी मुलगी घरी न आल्याने पीडितेच्या आईने तिची शोधाशोध घेतली. यावेळी आरोपी हा चिमुकलीला घेऊन गेल्याचं आईला समजलं. तिने आरोपीच्या घरी जाऊन पाहिलं असता, चिमुकली रडत असल्याचं दिसून आलं. आईने तिची पाहणी केली असता चिमुकलीवर अत्याचार झाल्याचं लक्षात आलं.

रात्री ७ वाजता मुलीच्या पोटात दुखायला लागल्यावर पीडितेच्या आईने पोलीस ठाण्यात जाऊन यासंदर्भात तक्रार दाखल केली. मुंढवा पोलिसांनी रात्री पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी केली. यानंतर आरोपीवर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी ४० वर्षाचा असून त्याला विविध व्यसन करण्याची सवय आहे, सध्या तो फरार असून शोधकार्य सुरू आहे.

 

 



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *