Pune Crime : पोलिस उपनिरीक्षकाच्या अंगावर घातली गाडी; गोळी झाडल्यावरही संशयित पसार, नवले पुलाजवळील घटना

Pune Crime  : रात्र गस्तीवर असताना संशयितांची चौकशी करण्यासाठी गेलेल्या पोलिस उपनिरीक्षकाच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रकार कात्रज येथे घडला. या वेळी उपनिरीक्षकाने स्वरक्षणार्थ पिस्तुलातून गाडीच्या चाकावर गोळी झाडली. त्यानंतर संशयित कार कात्रज येथून नवले पुलाच्या दिशेने पळून गेले.

संशयित कारमधील चौघांवर गुन्हा दाखल

ही घटना रविवारी मध्यरात्री अडीच वाजता कात्रज येथील वंडर सिटीजवळ घडली. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक रतिकांत चंद्रशा कोळी (वय ३०, रा. स्वारगेट) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून संशयित कारमधील चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वेळी आरोपींकडे शस्त्रे होती.

Pune Water Supply : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! येत्या गुरुवारी 'या' भागांत पाणीपुरवठा राहणार बंद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उपनिरीक्षक कोळी रविवारी मध्यरात्री कात्रज परिसरात त्यांच्या पथकासह गस्त घालत होते. त्यांना वंडरसिटीजवळ एका कारसह चार संशयित व्यक्ती दिसल्या. त्यामुळे कोळी संशयित कारजवळ जाऊ लागले. त्यांनी संबंधितांना थांबण्याचा इशारा केला असता, संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. ते कार ‘रिव्हर्स’ घेऊन चालले होते. पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता, कारचालकाने अचानक कार कोळी यांच्या दिशेने आणली. कोळी यांनी कार थांबविण्याचा इशारा केल्यानंतरही कार पुढे आली. त्या वेळी कोळी यांनी कारच्या चाकावर गोळी झाडली. त्यानंतरही कारचालकाने कार पुढे नेली आणि ते नवले पुलाच्या दिशेने पळून गेले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला; मात्र संशयित पळून गेले.

डिझेल चोरीचा प्रयत्न

संशयित कार घेऊन पसार झाल्यानंतर पोलिस पुन्हा वंडरसिटी येथील घटनास्थळी आले. तेथे एका ट्रकच्या डिझेल टाकीतून पाइपद्वारे डिझेल चोरले जात असल्याचे आढळून आले. सहायक निरीक्षक स्वप्नील पाटील या प्रकरणाचा तपास करीत आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply