Pune Crime : दारु प्यायला पैसे न दिल्याने डायरेक्ट लोखंडी रॉड डोक्यात टाकला; पुण्यात औंधमध्ये टोळक्याच्या मारहाणीत वृद्धाचा मृत्यू

Pune Crime : गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्हा हा गुन्हेगारी घटनांमुळे चांगलाच चर्चेत आहे. कल्याणीनगरच्या पोर्श अपघाप्रकरणानंतर पुण्यातील गुन्हेगारीचा मुद्दा आणखीनच ऐरणीवर आला आहे. या सगळ्यामुळे पोलीस दलाच्याकामगिरीवर  प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अशातच आता पुण्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील उच्चभ्रू परिसर समजल्या जाणाऱ्या औंध परिसरात मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या एका वृद्ध व्यक्तीला दारुच्या नशेत असणाऱ्या टोळक्याने मारहाण केली. यामध्ये वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. समीर रॉय चौधरी असे मृत व्यक्तीचे नाव आहे. 

या घटनेमुळे  पुण्यात चाललंय काय ? पुणे पोलीसांचा गुन्हेगारांना धाक उरलाय का असा प्रश्न पुन्हा उपस्थित झालाय. दारुसाठी पैसे देण्यास नकार देणाऱ्या जेष्ठ नागरिकाचा पुण्यातील परिहार चौकासारख्या उच्चभ्रू परिसरात डोक्यात रॉड मारुन हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

Mumbai News : पत्नीच्या त्रासाला कंटाळून पोलीस कॉन्स्टेबलने संपवलं जीवन; मुंबईतील धक्कादायक घटना

समीर रॉय चौधरी असं हत्या झालेल्या ७७ वर्षीय ज्येष्ठ नागरीकाच नाव असून ते टाटा कंपनीतुन सेवावृत्त झाल्यावर पुण्यातील औंध भागात स्थायिक झाले होते. गुरुवारी पहाटे सव्वा पाच वाजता ते मॉर्निंग वॉक साठी बाहेर पडले आणि परिहार चौकालगत असलेल्या फुटपाथवरून ते निघाले. त्यावेळी रात्रभर दारु पार्टी केलेलं चार जणांच टोळकं बाहेर पडलं होतं. या टोळक्याला आणखी दारू हवी होती आणि त्यासाठी पैसे हवे होते. 

त्यासाठी या टोळक्याने मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या व्यक्तींवर हल्ले सुरु केले. दोन व्यक्तींवर हल्ला केल्यावर या टोळक्याने समीर रॉय चौधरी यांना गाठले. टोळक्याने त्यांच्याकडे दारुसाठी पैशांची मागणी केली. मात्र, त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे वैतागलेल्या टोळक्याने समीर रॉय चौधरी यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने घातला. यामध्ये समीर रॉय चौधरी गंभीर जखमी झाले आणि उपचारादरम्यान शुक्रवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी चार आरोपींना अटक केली असून विशेष म्हणजे त्यातील तीन आरोपी हे अल्पवयीन आहेत. त्यापैकी दोन अल्पवयीन आरोपींवर आधीच हत्येचा गुन्हा दाखल असुन मागील आठवड्यातच ज्युवेनाईल कोर्टाने त्यांची बाल निरीक्षण गृहातून जामीनावर सुटका केली होती. त्यामुळे अल्पवयीन मुलांच्या हातून घडणाऱ्या गुन्ह्यांना रोखण्याचे कायदेशीर आव्हान पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply