Pune Crime : खरेदी करण्यासाठी आला अन् सोन्याची चैन घेवून झाला फरार; पुण्याच्या वाघोलीतील घटना

Pune Crime : सराफ दुकानात सोने खरेदीच्या बहाण्याने आलेल्या तरुणाने दुकानातील दोन चैन गळ्यात घालून धूम ठोकली. सदरची घटना वाघोलीतील डी. बी. ज्वेलर्स येथे घडली. या प्रकरणी पाथर्डी (जि. नगर) येथील एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पुण्याच्या वाघोली येथील डी. बी. ज्वेलर्सचे सराफ व्यावसायिक व रवि घुले यांची ओळख होती. दरम्यान घुले हा चैन घेण्याच्या बहाण्याने दुकानात आला होता. त्याला सोन्याच्या दोन चैन दाखविल्यानंतर एक चैन त्याने गळ्यात घातली. यानंतर घातलेली चैन तो आरशात बघत होता. या दरम्यान दुकानदार दुसऱ्या ग्राहकांशी बोलण्यात व्यस्त असल्याचे पाहून नजर चुकवून तो दुकानातून फरार झाला. 

Nanded News : प्रशासनाला मराठा आंदोलकांची धास्ती; अशोक चव्हानांच्या सभेपूर्वी ४० आंदोलकांना नोटीस देत केले स्थानबद्ध

सदर प्रकार सराफाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याचा शोध घेतला. यानंतर मोबाईलवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता  त्याचा मोबाईल देखील बंद आला. याप्रकरणी सोने दुकानदारांनी फिर्याद दिली असून रवी पोपट घुले (वय ३४, रा. पाथर्डी, अहमदनगर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर सराफाने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply