Pune Crime : राजगडाच्या पायथ्याशी अढळला तरुणीचा मृतदेह; MPSC परीक्षेत राज्यात आली होती सहावी!

Pune Crime - किल्ले राजगड पायथा (ता.वेल्हे) येथील सतीचा माळ या ठिकाणी आज रविवार (ता.१८) रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास नगर जिल्ह्यातील उच्चशिक्षित युवतीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

दर्शना दत्ता पवार (वय.२६) असे युवतीचे नाव असून मुळ गाव, संजीवनी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखाना कॉलनी ,सहजानंदनगर ,ता.कोपरगाव, जि.अहमदनगर असे असुन तिची रेंज फॉरेस्ट ऑफिसर या पदावर नव्याने निवड झाली होती ती एमपीएससी परीक्षेत राज्य सहावी आली होती.

दर्शना पुण्यातून १२ जून पासून बेपत्ता असल्याची तक्रार सिंहगड रोड पोलीस स्टेशन मध्ये दाखल होती. दरम्यान या घटनेबाबत वेल्हे पोलिस ठाण्यात मुलीचे वडील दत्ता दिनकर पवार यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत वेल्हे पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार

९ जून रोजी दर्शना ही पुण्यातील एका खाजगी अकॅडमी (स्पॉटलाईट) मध्ये सत्कार स्विकारण्यास आली होती .दुसर्‍या दिवशी १० जून रोजी दर्शनास दिवसभर घरातील व्यक्तींकडून फोन करीत असताना घरातील कोणत्याही व्यक्तीचे फोन तीने उचलले नाहीत.

दरम्यान मुलीच्या वडिलांनी १२ जून रोजी पुणे येथे येऊन अकॅडमी चौकशी केली असता मुलगी दर्शना ही तिचा मित्र राहुल दत्तात्रेय हंडोरे यांच्यासोबत सिंहगड व राजगड किल्ले फिरण्यासाठी गेली असल्याची माहिती मिळाली.

त्यानंतर मुलीचा शोध चालू होता दरम्यान आज रविवार (ता.१८) जून रोजी किल्ले राजगड च्या पायथ्याशी असलेल्या सतीचा माळ येथे गुंजवणी ग्रामपंचायतचे सदस्य शिवाजी भोसले हे गुरे चालत असताना जवळपास काही दुर्गंधी येत असल्याचे जाणवल्यानंतर त्यांनी परिसरात पाहणी केली.

असता एक मृतदेह अर्धवट सडलेल्या स्थितीत आढळून आला या घटनेची माहिती पोलीस पाटील बाळासाहेब रसाळ यांना कळविल्यानंतर रसाळ यांनी वेल्हे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांच्याशी संपर्क साधला वेल्हे पोलीस स्टेशनची टीम,व दर्शनाचे वडील दत्तात्रेय पवार घटनास्थळी दाखल

झाल्यानंतर मृतदेहाजवळ मोबाईल, पर्स, शूज,ओढणी हे दर्शनाचे तर बॅग व जॅकेट हे राहुल हंडोरे याचे आढळून आले आहे दरम्यान राहुल हंडोरे हा युवक बेपत्ता असून त्याचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून चालू आहे.

दरम्यान ग्रामपंचायतचे उपसरपंच बाळासाहेब पवार व स्थानिक राहुल बांदल, पोलीस मित्र संतोष पाटोळे, होमगार्ड विजय गोहिणे, विक्रांत गायकवाड यांनी मृतदेह गडाच्या पायथ्यास आणण्यास मदत केली.

हा मृत्यू आकस्मित आहे की घातपात याबाबत वेल्ह्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास पोलीस नाईक अजय शिंदे, गोपनीय विभागाचे ज्ञानदीप दिवार ,पोलीस हवालदार औदुंबर अडवाल, योगेश जाधव, करीत आहेत.मृतदेह हा शवविच्छेदन साठी पुणे येथील ससून रुग्णालयात पाठवण्यात आला असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी दिली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply