Pune Crime : पुणे स्टेशनवर संशयास्पद फिरणाऱ्या व्यक्तीला अटक, झडतीत सापडले पिस्तूल

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर लोहमार्ग पोलीस पुणे रेल्वे स्टेशनवर बंदोबस्त करीत असताना एकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. रेल्वे स्थानकावर अवैधरित्या पिस्तूल आणि काडतुसे बाळगल्याप्रकरणी पुणे रेल्वे पोलिसांकडुन मंगळवारी (24 जानेवारी) गुजरातमधील एका व्यावसायिकाला अटक करण्यात आली आहे.

रेल्वे स्टेशनवर या व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद जाणवल्यानंतर पोलिसांनी त्याला पकडलं. चौकशी करुन झडती घेतली असता त्याच्याकडून परदेशी बनावटीचं पिस्तूल, सहा जिवंत काडतुसे यांच्यासह जवळपास साडेतीन लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. अनिलकुमार रामयज्ञ उपाध्याय (वय 47 वर्षे, रा. रामेश्वर रेसिडेन्सी, सुरत) असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे.

आरोपी व्यावसायिक सुरतवरुन बंदूक घेऊन महाराष्ट्रात आला होता. या व्यावसायिकाने बेकायदेशीरपणे पिस्तूल का बाळगलं होतं, याचा तपास सध्या सुरु आहे. या व्यावसायिकाच्या विरोधात पोलीस हवालदार निशिकांत राऊत यांच्या तक्रारीनंतर पुणे रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या व्यक्तीकडे विनापरवाना पिस्तूल होती. कोर्टाने व्यक्तीला पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. आम्ही अधिक तपास करत आहोत, अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply