Pune Crime : जिथे दहशत माजवली तिथेच उतरवला माज! धायरीत कोयता गँगच्या गुंडाची पोलिसांकडून धिंड

Pune Crime : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात कोयता गँगने हैदोस घातला आहे. एकीकडे पोलिस या गँगमधील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळत असताना, दुसरीकडे कोयता गँगची दहशत काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. अशातच, पोलिसांनी कोयता गँगमधील तीन सराईत गुंडांना पकडून त्यांची वाजत गाजत धिंड काढली. 

कोयता गँगच्या गुंडांनी ज्या परिसरात दहशत माजवली त्याच परिसरातून धिंड काढून पोलिसांनी त्यांचा माज उतरवला. मनोज कटीमनी, रोहित राठोड आणि रोशन आढाव अशी या गुंडांची नावे आहेत.

पुण्यातील सिंहगड रोड पोलिसांनी अटक करून, धायरी फाटा ते धायरी गाव दरम्यान या गुंडांची धिंड काढली आहे. धायरीत दहशत माजवणाऱ्या कोयता गँगच्या गुंडांना गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयवंत राजूरकर,सहाय्यक निरीक्षक भरत चंदनशिव,फौजदार निकेतन निंबाळकर, शिपाई अमोल कट्टे, नीलेश खांबे आदींनी पकडले होते.

कोयता गँगच्या उपद्रव वाढताच

सकाळी आणि सायंकाळी भर गर्दीच्या वेळी अतिशय भरधाव वेगाने, चित्रविचित्र हॉर्न वाजवत वाहने पिटाळणे, वाहतुकीच्या विरुद्ध दिशेने येत दांडगाई करणे, कोयता, तलवारींचा धाक दाखवून खंडणी मागणे, मनाविरुद्ध वागणाऱ्यांना मारहाण करणे असे प्रकार सुरुच आहेत.

अल्पवयीन मुले गुन्हेगारीकडे आकर्षित झाली आहेत. त्यामुळे नागरिकांसह पोलिस दलाचीही डोकेदुखी वाढली आहे. अशातच गुंडगिरी आणि गुन्हेगारीच्या प्रकारांना अटकाव करण्यासाठी त्याचबरोबर नागरिकांच्या मनातील दहशत कमी करण्यासाठी पोलिस कोयता गँगच्या गुंडांची धिंड काढत आहेत.तरीही गुन्हे कमी होत नसल्यामुळे पोलीस ही चक्रावून गेले आहेत.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *