Pune Chipko Andolan : साडेसहा हजार वृक्षतोडीच्या विरोधात तरुण एकवटले, पर्यावरण प्रेमी पुणेकरांचे चिपको आंदोलन

Pune Chipko Andolan : पुण्यातील मुळा मुठा नदी सुधार प्रकल्पासाठी नदी परिसरातील झाडं तोडण्यात येणार आहे. याला मोठ्या प्रमाणात पर्यावरण प्रेमींनी विरोध केला आहे. पुण्यातील मुळा मुठा नदी सुधार प्रकल्पात जी झाडं तोडण्यात येणार आहेत त्या विरोधात पुण्यातील पर्यावरणप्रेमींनी आज चिपको आंदोलन केलं. पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर हे आंदोलन करण्यात आलं. सुंदरलाल बहुगुणा यांनी केलेल्या चिपको आंदोलनाची पुनरावृत्ती या आंदोलनदरम्यान करण्यात आल्याचं पर्यावरणप्रेमींनी सांगितलं.

आज जंगली महाराज रस्त्यावरील झाडांना सर्व आंदोलनकर्त्यांनी मिठी मारणार हे आंदोलन केलं. यावेळी नदी सुधार प्रकल्पात झाडं तोडण्यास नागरिकांनी विरोध दर्शवला आहे.दरम्यान, नदी सुधार प्रकल्पासाठी साडेसहा हजार वृक्षतोडी करण्यात येणार आहे. याविरोधात हे आंदोलन करण्यात आलं.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply