
ढोले पाटील रस्त्यावरील पदपथावरून एका तीन वर्षे वयाच्या चिमुकलीच्या अपहरणाचा गुन्हा पोलिसांनी सात दिवसांच्या प्रयत्नांनंतर उघडकीस आणला असून, महिला आरोपीस अटक करून मुलीची सुटका केली आहे. मुलीला लग्नात हुंडा मिळतो, पण तोवर ती भीक मागून पैसे कमवून देईल, या उद्देशानेच या महिलेने मुलीचे अपहरण केले असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.
उषा नामदेव चव्हाण (वय ४६, रा. श्रीगोंदा, जि. नगर) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी कोरेगांव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. गौरी विनोद गायकवाड (वय ३) असे सुटका केलेल्या चिमुकलीचे नाव आहे. याबाबत गौरीची आई मयुरी यांनी तक्रार दिली आहे. मयुरी यांना दोन अपत्ये आहेत. ढोले पाटील रस्त्यावर त्या फुगे विकतात. २३ मे रोजी फुगे विक्री करत असताना दुपारी उन्हामुळे त्या रिक्षात बसून विश्रांती घेत होत्या. त्यांची दोन्ही मुले खेळत होती. भरदुपारी दीडच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने गौरीचे अपहरण केले. काही वेळाने हा प्रकार मयुरी यांच्या लक्षात आला. त्यांनी शोधाशोध केली. पण, मुलगी न सापडल्याने त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.
वरिष्ठ निरीक्षक विनायक वेताळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमोल घोडके आणि त्यांच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही तपासले. त्यात एक महिला मुलीला ओढणीत गुंढाळून नेत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी परिसरातील इतर सीसीटीव्ही तपासून या महिलेची ओळख पटविली आणि खबऱ्यांकडून तिची माहिती घेतली. ती श्रीगोंदा येथील असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी श्रीगोंदा शहर गाठले आणि तिला ताब्यात घेतले. आरोपी उषा हिचा विवाह झालेला असून, तिला दोन मुलगे आणि दोन मुली आहेत. त्यांच्या समाजात नवऱ्या मुलाच्या कुटुंबाकडून हुंडा दिला जातो. तिच्या एका मुलीचा विवाह झालेला आहे. या विवाहात नवऱ्या मुलाच्या वडिलांकडून तिला ३० हजार रुपये मिळाले होते. हुंडा मिळेल तसेच तिला भीक मागण्यास लावता येईल, यासाठी अपहरण केल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
- सूर्यप्रकाशापासून त्वचेचे संरक्षण: सनस्क्रीन वापरताना या महत्त्वाच्या चुका टाळा!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी



























Subscribe to my channel


