Pune Chandni Chowk : पुण्यातील चांदणी चौक लोकार्पण समारंभाला CM शिंदेंची दांडी? राजकीय चर्चांना उधाण

Pune Chandni Chowk : चांदणी चौक उड्डाणपुलाच्या उद्घाटनाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार नसल्याचे वृत्त आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या त्याच्या दरे या गावी मुक्कामी आहेत. उड्डाणपूलाच्या उदघाटन सोहळ्याला मुख्यमंत्री प्रमुख अतिथी होते. मुख्यमंत्र्यांनी त्याच्या या कार्यक्रमात अचानक बदल करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे कार्यक्रमाला येणार नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

साताऱ्यातील आपल्या गावी थांबणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. आज चांदणी चौक उड्डाणपुलाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमात प्रमुख अतिथि म्हणून एकनाथ शिंदे यांचे नाव आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे त्यांच्या मूळ गावी आहेत. त्यामुळे ते या कार्यक्रमाला येणार नसल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच दहा महिन्यांपूर्वी चांदणी चौकातील वाहतूक कोंडीचा फटका बसला होता. ते साताऱ्याकडे जात असताना वाहतूक कोंडीत अडकले होते. यावेळी पुणेकरांनी ही समस्या त्यांच्याकडे मांडली होती. मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर पुलाचे काम करण्याचे आदेश दिले होते. परंतु आता तेच समारंभाला येणार नसल्याचे वृत्त आहे.

Pune : वाहतुक कोंडीतून पुणेकरांची सुटका! चांदणी चौक उड्डाणपुल वाहतुकीसाठी खुला; आज उद्घाटन

केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी पुलाचे उद्घाटन करणार आहेत. आज सकाळी ११ वाजता हा समारंभ होणार आहे. उद्घाटनाची सगळी तयारी पूर्ण झाली आहे. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार ,पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आदी मान्यवर राहणार सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply