Pune Chandni Chowk : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, चांदणी चौक उद्यापासून वाहतुकीसाठी खुला होणार

Pune Chandni Chowk : वाहतूक कोंडीने त्रस्त होऊन बसलेल्या पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शहरातील वाहतूक कोंडी लवकरच सुटण्याची शक्यता आहे. कारण, पुण्यातील चांदणी चौकाचे बांधकाम पूर्ण झाले असून हा पूल उद्यापासून वाहतुकीसाठी खुला होणार आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार पुलाचे उद्घाटन होणार आहे. चांदणी चौक शहराच्या वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. या ठिकाणाहून ५ वेगवेगळे मार्ग जातात.

मात्र, अरूंद रस्त्यामुळे चांदणी चौकात वाहतुकीची कोंडी सातत्याने होत होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही वाहतूक कोंडीचा फटका बसल्यानंतर जुना पूल पाडून नव्याने उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय जाहीर झाला.

मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांचा ताफा वाहतूक कोंडीत अडकल्यानंतर चांदणी चौकातील वाहतूक कोंडी आणि जुन्या उड्डाणपुलाचा प्रश्न ऐरणीवर आला. यावेळी चांदणी चौकातील जुना उड्डाणपूल पाडण्याच्या कामाचीही मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली. २ ऑक्टोबर रोजी जुना पूल पाडण्यात आल्यानंतर नव्या उड्डाणपुलासाठी काम सुरू करण्यात आले.

त्यानंतर अडचणींवर मात करत उड्डाणपूलचे काम विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आले आहे. रखडलेले भूसंपादन, सेवा वाहिन्यांचे स्थलांतर, न्यायालयीन प्रकरणे आणि स्थानिक अतिक्रमणे आदी अडचणी गतीने कार्यवाही करत दूर करण्यात आल्या. नव्याने बांधण्यात आलेला हा उड्डाणपूल ११५ मीटर लांब असून ३६ मीटर रुंदीचा आहे.

Pune MNS News : वैद्यकीय महाविद्यालयाची तोडफोड भोवली, पुण्यात मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

असे आहेत चांदणी चौकातील ८ रॅम्प

१) मुळशी - सातारा

२) मुळशी - मुंबई

३) मुळशी - पाषाण

४) सातारा - कोथरूड ते मुळशी

५) पाषाण - मुंबई

६) पाषाण - सातारा

७) सातारा - कोथरूड ते पाषाण

८) सातारा -मुळशी

चांदणी चौकाबाबत महत्वाचे मुद्दे

- २८ फेब्रुवारी २०१९ ला भूमिपूजन

- या प्रकल्पावर ४०० कोटी रुपये खर्च

- १२ ऑगस्ट २०२३ म्हणजे उद्या रोजी वाहनांसाठी पूल होणार

- प्रकल्पात ८ रॅम्प तयार करण्यात आलेत आहेत

- कोथरूड कडून मुळशी कडे जाण्यासाठी भुयारी मार्ग

- वाहतूक कोंडीत मुख्यमंत्री अडकल्यानंतर कामाला गती

- प्रकल्पातील सर्व रस्त्यांची लांबी १७ किलोमीटर

- सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी प्रति तासाला सुमारे १ लाख वाहने जातात तर इतर वेळी प्रतितास ३० हजार वाहने जातात

- चांदणी चौकात जुन्या पुलाखाली ४ लाईनचा अरुंद रस्ता होता. त्यामुळे वाहतूक कोंडी होत होती. आता पुलालगतच पाषाण फोडून तिथे रस्ता रुंदीकरण करण्यात आले.

- एनडीए ते पाषाण या नवीन पूलावर ६ मार्गिका तयार करण्यात आल्या आहेत. तर मुख्यमार्गावर आता १४ मार्गिका करण्यात आल्या आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply