Pune CCTV : धक्कादायक! पुण्यात १ हजार सीसीटीव्ही बंद, नागरिकांच्या सुरक्षेचं काय?

Pune : पुण्यामध्ये गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. रोज महिला अत्याचार, हत्या, तोडफोड, तलवार गँग, मारहाणीच्या घटना समोर येत आहेत. अशामध्ये पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आहे. पुणे शहरामध्ये जवळपास १ हजारांपेक्षा जास्त सीसीटीव्ही बंद आहेत. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर पुण्यातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. महत्वाचे म्हणजे पोलिस स्टेशन हद्दीतील सर्वाधिक सीसीटीव्हीचा यामध्ये समावेश आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचं काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. साम टीव्हीच्या हाती या बंद असलेल्या सीसीटीव्हीची लिस्ट लागली आहे.

कोट्यावधी रुपये खर्च करून महापालिकेने पुण्यात २ हजार ९०९ सीसीटीव्ही बसविले होते. मात्र यातील १ हजार ५४ सीसीटीव्ही बंद आहेत. महापालिकेच्या विद्युत विभागाने लावण्यात आलेल्या २ हजार ९०९ सीसीटीव्ही पैकी १ हजार ८५५ सीसीटीव्ही कॅमेरे सुरू आहेत. सीसीटीव्ही महापालिकेने बसविलेले असले तरी त्याचे नियंत्रण पोलिसांकडे आहे. त्यामुळे या निकामी झालेल्या सीसीटीव्हीच्या दुरुस्तीचा खर्च करणार कोण? याबाबत स्पष्टता नसल्याने ते बंद आहेत.

Pune ATS : 3788 सिम कार्ड, 7 सिम बॉक्स, लॅपटॉप...; गणेशोत्सवाआधीच पुण्यात ATS च्या कारवाईनं मोठी खळबळ

पुणे शहरात तब्बल १००० सीसीटीव्ही बंद आहेत. पुण्यातील २५ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील हे सर्व सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. केबल तुटल्यामुळे १००० कॅमेरे बंद असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यात २ हजार ९०९ सीसीटीव्ही बसविले होते. यातील १०५४ सीसीटीव्ही बंद तर १८५५ सुरू आहेत. या बंद सीसीटीव्हींमुळे पुण्यातील महिला, तरुणी, लहान मुलं आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पुणे शहरात बंद असलेल्या सीसीटीव्हीची यादी -

संभाजी पोलिस चौकी - ३०

नारायणपेठ - २७

शनिवार पेठ - ३५

खडक - ३९

सेनादत्त- ३४

मंडई - ३८

मीठगंज- १३

पेरूगेट - २६

सहकारनगर - २४

महर्षीनगर - ७१

मार्केटयार्ड - ४२

वानवडी बाजार -२१

घोरपडी- ९

विश्रांतवाडी - ७

समर्थ पोलिस ठाणे- १३९

गाडीतळ- १८

कसबा पेठ - ३३

जनवाडी - ४०

अलंकार - ८

कर्वेनगर - ७१

डहाणूकर - १५

हॅपी कॉलनी - ६

ताडीवाला रस्ता- ७०

कोंढवा - ४९

अप्पर इंदिरानगर - १००

रामोशी गेट - २

काशेवाडी - ४

पेरुगेट - २

सहकारनगर - ५

सहकारनगर तळजाई - ३

पर्वती दर्शन - ४

लक्ष्मीनगर - ४

वानवडी बाजार - २

तुकाई दर्शन - ६

कोरेगाव पार्क - २

विश्रांतवाडी- ४

कसबा पेठ - ८

शिवाजीनगर पोलिस ठाणे- ४

शिवाजीनगर चौकी - ५

पांडवनगर - ९

जनवाडी- ४

कोथरूड पोलिस ठाणे - ९

कर्वेनगर - २



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply