Pune Car Accident : मोठी बातमी! पुणे अपघात प्रकरणी दोन पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन

Pune Car Accident : पुणे अपघात प्रकरणी एक मोठी बातमी समोर आली आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यातील दोन पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. ड्रंक-ड्राईव्ह प्रकरणी पुणे पोलिसांनी चौकशीसाठी एक इन्टर्नल कमिटी बनवली होती. त्यातच हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, क्राईम पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहायक पोलीस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी यांचं निलंबन करण्यात आलं आहे. यांच्यावर झालेल्या कारवाईचं कारणही समोर आलं आहे. सांगण्यात येत आहे की, अपघात झाल्यानंतर यांनी कंट्रोल रूमशी संपर्क केला नाही. तसेच नाईट राऊंडचे पोलीस उपायुक्त यांना माहिती न दिल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

Pune Porsche Car Accident : पुणे पोर्शे कार अपघातात मोठी अपडेट, अल्पवयीन आरोपीच्या आजोबाला अटक; ड्रायव्हरला डांबून ठेवल्याचा आरोप

दरम्यान, येरवडा पोलीस ठाण्यात असलेला अपघाताचा गुन्हा आता गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. येरवडा पोलीस ठाण्याच्या सहायक पोलिस आयुक्त आरती बनसोडे यांच्याकडून हा तपास काढातून घेण्यात आला आहे. गुन्ह्याची व्याप्ती वाढल्याने, तसेच येरवडा पोलिसांच्या भूमिकेबद्दल संशय निर्माण झाल्यामुळे पोलीस आयुक्तांनी हा निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात येत आहे. यापुढे गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे याप्रकरणी तपास करणार आहेत.

विशाल अग्रवाल यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

दरम्यान, पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपाचे वडील विशाल अग्रवाल यांना आज न्यायालयात हजार करण्यात आलं होतं. न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यांच्यासह आज सहा आरोपींना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली सुनावली आहे. चार आरोपी हे पबचे मालक आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply