Pune Car Accident : हिट अँड रन केस: प्रसिद्ध व्यावसायिक आहेत म्हणून सोडू नका, रविंद्र धंगेकर आक्रमक; पोलिसांना आंदोलनाचा इशारा

 

Pune Car Accident : पुणे शहरात बड्या उद्योगपतीच्या अल्पवयीन मुलाने भरधाव कार पळवत दोघांना चिरडल्याची घटना घडली. या भयंकर अपघाताच्या घटनेनंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. या अल्पवयीन मुलावर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. याप्रकरणी काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

पुण्यातील हिट अँड रन प्रकरणावरुन काँग्रेस नेते, आमदार रविंद्र धंगेकर यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलनाचा इशारा दिला आहे. आज सायंकाळी चार वाजता रविंद्र धंगेकर हे येरवडा पोलीस स्टेशनच्या बाहेर आंदोलन करणार आहेत. प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक आहेत म्हणून त्यांना सोडून देऊ नये, असे पत्रही रविंद्र धंगेकर यांनी पुणे पोलिसांना लिहले आहे.

Lok Sabha Election : मुंबई, ठाणे, रायबरेलीसह ४९ जागांवर आज मतदान, ५व्या टप्प्यात या दिग्गजांचं भवितव्य पणाला

या हिट अँड रन प्रकरणात पोलीस जबाबदार आहेत. याप्रकरणात येरवडा पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची चौकशी करावी अशी मागणी करत पोलिसांकडून कारवाईची अपेक्षा आहे, असेही रविंद्र धंगेकर म्हणालेत.

दरम्यान, पुण्यात रात्री दीड ते दोन वाजेपर्यंत पब व बार उघडे राहत असल्याने अनेक गैरप्रकार घडत आहेत, अपघातही वाढत आहेत. शहरातील आणि बारच्या वेळा बदलून त्या कमी करा,अस पत्र यापूर्वी ही पोलिस प्रशासनाला दिले होते. त्यामुळे पब व बारवर कारवाई करा, अशीही धंगेकर यांची पोलीस प्रशासनाला मागणी आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply