Pune Bypoll election : पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिंचवडच्या दळवी नगरमध्ये 43 लाख रुपयांची रोकड सापडली

 

Pune Bypoll election : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात सगळीकडे काटेकोरपणे नजर ठेवण्यात येत आहे. त्यात चिंचवडच्या  दळवी नगरमध्ये 43 लाख रुपयांची रोकड (Cash) मिळाली आहे. ही रोकड नेमकी कशासाठी वापरली जाणार होती? किंवा कोणासाठी वापरली जाणार होती. हे चित्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही मात्र चालकाकडून चौकशीत समाधान कारक उत्तर न मिळाल्याने पोलिसांना बोलवत कारवाई करण्यात आली आहे.

पुण्यात सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. त्यामुळे शहरात कोणतेही अवैध कार्य होऊ नये यासाठी खबरदारी बाळगली जात आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील दळवी नगर परिसरात निवडणूक विभागाचे अधिकारी तपासणी करत होते. त्यावेळी एका कारमध्ये 43 लाख रुपयांची रोकड सापडली आहे. एवढंच नाही तर गाडीमध्ये धारदार हत्यारे सापडली असून कार चालकाला ताब्यात घेऊन चौकशी सुरु करण्यात आली आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील दळवी नगर परिसरात निवडणूक विभागाचे अधिकारी तपासणी करत होते. त्यावेळी एका कारमध्ये त्यांना 43 लाख रुपयांचं घबाड हाती लागलं. यावेळी त्यांनी चालकाची चौकशी केली. विचारपूस केली मात्र या 43 लाख रुपयांसंदर्भात चालकाने दिलेले उत्तर पोलिसांना आणि निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना सामाधानकारक न वाटल्याने ही कारवाई केली आहे.

पुण्यात पोटनिवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे शहरात दोन्ही मतदारसंघात झाडाझडती घेतली जात आहे. त्यातच अनेक परिसराची पाहणीदेखील केली जात आहे. हीच झाडाझडती सुरु असताना हे 43 लाखांचं घबाड पोलिसांच्या हाती लागलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply