Pune Bus Stop: बिबवेवाडी बस थांबा तीन वर्षापासुन प्रतिक्षेतच

बिबवेवाडी : स्वामी विवेकानंद मार्गावरील गावठाण चौकात अप्पर च्या बाजूला असणारे बस थांबा शेड तीन वर्षापूर्वी काढलेले ते अद्याप बसविण्यात आले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांसह प्रवाशांना उन्हा पावसात रस्त्यावर उभे राहून बसची वाट पहावी लागत आहे.

स्वामी विवेकानंद मार्गाचे सीमेंट काँक्रीटकरण करताना प्रेम नगर सोसायटी, ईएसआय हॉस्पिटल, बिबवेवाडी गावठाण, इंदिरा नगर, अप्पर येथील बस थांबा शेड काढलेले आहेत ते अद्याप बसविण्यात आले नाही. त्यामुळे नागरिकांना ऊन पावसात रस्त्यावर उभे राहून रस्त्याच्या मध्यावर जाऊन जीव धोक्यात घालून बस पकडावी लागत आहे.

गावठाण चौकात सहा शाळा असून परिसरातील सुमारे वीस हजार विद्यार्थी शिक्षण घेतात, बसने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे परंतु बस थांबा शेड नसल्यामुळे विद्यार्थ्यांना रस्त्यावर किंवा दुकानांच्या आडोशाला उभे राहून बसची वाट पाहत थांबावे लागते.

Pune : शेतात जायला रस्ताच नाही; महिलेनं हेलिकॉप्टरसाठी सरकारकडं मागितली परवानगी

अनेक वेळा बस थांब्याच्या जागेवर बस थांबली नाही तर विद्यार्थी चौकातील वाहतूक सिग्नलला बस थांबल्यानंतर जीव धोक्यात घालून बस पकडतात त्यामुळे अपघात होतात.

बस थांबा शेड नसल्या बाबत सकाळने अनेक वेळा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे, नागरिकांनी अनेक वेळा पीएमपीएलला बस थांबा शेड बसवण्याची मागणी केली आहे परंतु प्रशासनाने अद्याप बस थांबा शेड लावले नाहीत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply