Pune Bus Accident : महामार्ग ओलांडतांना पादचाऱ्याला ST बसने उडवलं, ४१ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू

Pune Bus Accident : पुणे-नगर महामार्गावर बसने पदचाऱ्याला धडक दिल्याची घटना घडली. या बसच्या धडकेत पदचारी व्यक्तीचा मृत्यू झालाय. ही बस राजगुरुनगरहून पैठणकडे जात होती. दरम्यान अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचं वय ४१ असून त्याची अजून ओळख पटलेली नाहीये.
 
मिळालेल्या माहितीनुसार, पादचारी पुणे-नगर महामार्ग ओलांडत होता. त्याचवेळी राजगुरुनगर ते पैठण ही बस नगरच्या दिशेने जात होती. पदचारी अचानक बससमोर आल्याने चालकाला बस नियंत्रणात आणता आली नाही आणि बसची पदचाऱ्याला धडक बसली. धडक बसल्यानंतर पदचारी खाली पडला आणि बसच्या मागील चाकाखाली आला, त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान अपघात झाल्यानंतर बस चालक तेथून पळून जात त्याने पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केलं.
 
अपघाताची माहिती कळताच लोणीकंद पोलीस आणि लोणीकंद वाहतूक विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले. मृत व्यक्तीला ससून रुग्णालयात हलवून बस रस्त्यातून हटविली. या अपघातामुळे काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती.
 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply