
Pune Crime : पुण्यातील बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपींना शोधण्यासाठी पुणे पोलिसांनी त्यांचे स्केच तयार केले आहे. आरोपी हे २५ ते ३० वयोगटातील असून ते मरोठी बोलत असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी २५ पथकं तयार केली आहेत. या घटनेला आठवडा झाला तरी देखील पुणे पोलिसांना आरोपींना शोधण्यात यश आले नाही. या प्रकरणाची सरकारने गंभीर दखल घेतली असून आरोपींना लवकरात अटक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे पुणे पोलिस अलर्ट मोडवर आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बोपदेव घाटात तरुणीवर सामूहिक बलात्कार प्रकरणी पुणे पोलिसांकडून तीन संशयित आरोपींचे वर्णन करण्यात आले आहे. आरोपींपैकी एका तरुणाचे वय सुमारे २५ वर्षे असून त्याचा वर्ण सावळा, मध्यम बांधा आहे. घटनेच्या वेळी त्याने जिन्स पँट, शर्ट, पायात चप्पल आणि काळ्या रंगाचे जॅकेट घातले होते आणि तो मराठीमध्ये बोलत होता. दुसऱ्या आरोपीचे वय सुमारे ३० वर्षे असून वर्ण सावळा आहे. त्याने जिन्स पँट, पूर्ण बाह्यांचा शर्ट, करड्या रंगाचे स्वेटर परिधान केले होते. दाढी आणि मिशी वाढलेली असून तो हिंदी भाषा बोलत होता.
|
|
तिसऱ्या आरोपीचे वय सुमारे २५ वर्षे आहे. वर्ण सावळा आहे. त्याने जिन्स पँट, लेदरचे जॅकेट परिधान केले होते आणित्याची बोलीभाषा मराठी आहे. आरोपींबाबत माहिती देणाऱ्यांना १० लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. आरोपींबाबत माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी बोपदेव घाटात यापूर्वी लूटमार आणि विनयभंगाचे गुन्हे दाखल असलेल्या रेकॉर्डवरील आरोपींची कसून चौकशी केली जात आहे. गुन्हे शाखेसह पोलिसांच्या २५ पथकांकडून या गुन्ह्याचा तपास करण्यात सुरूवात केली आहे.
दरम्यान, कोंढवा परिसरातील बोपदेव घाटात गुरुवारी रात्री महाविद्यालयीन तरुणीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केला होता. या घटनेमुळे पुणे हादरले आहे. पीडित तरूणी आणि तिच्या मित्राला मारहाण करत आरोपींने हे निर्दयी कृत्य केले. कोयता, चाकू आणि लाकडी काठीने त्यांना मारहाण करत जीवे मारण्याची धमकी आरोपींनी दिली होती. तरुणीकडील दागिणे काढून घेतले. पीडित तरुणीच्या मित्राचे हात-पाय बांधून त्याच्यासमोरच तिच्यावर अत्याचार करण्यात आले होते. पीडित तरुणीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती




























Subscribe to my channel


