Pune BJP Protest : पुण्यात मतदानादरम्यान भाजपचे आंदोलन, पदाधिकाऱ्यांचा भरचौकात ठिय्या

 

Pune BJP Protest :  पुणे लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. दरम्यान पुण्यातील फडके हौद परिसरात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मतदान केंद्र परिसरात काँग्रेसचे बॅनर असल्याने आक्षेप घते रस्त्यावर आंदोलनाला सुरूवात केली आहे.

यावेळी भाजप नेते आणि स्थायी समितीचे माजी सभापती हेमंत रासणे यांच्या नेतृत्त्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी रस्त्यावर बसून आंदोलनाला सुरूवात केली.

Pune News : पुणे, मावळ, शिरुरममध्ये विविध ठिकाणी EVM मशीन बिघडले; मतदार रांगेत खोळंबले!

आज सकाळी मतदानाला सुरूवात झाल्यानंतर फडके हौद परिसरात काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या बूथवर त्यांच्या नावाचा बॅनर आणि पक्षाचे चिन्ह असलेला फलक लावल्याने भाजपने यावर आक्षेप घेतला व तेथेच खाली बसून आंदोलनाला सुरूवात केली.

यावेळी या प्रकरणावर बोलताना भाजप नेते हेमंत रासणे म्हणाले, 11 तारखेला प्रचार संपलेला असताना आज मतदानादिवशी विरोधी पक्षातील उमेदवाराच्या बूथवर त्यांचे नाव आणि चिन्ह झळकत आहे. हे लोकशाही विरोधात असून, त्यांच्यावर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे.

यादरम्यान, हे लक्षात घेण्यासारखे आहे की, साधारण दोन वर्षांपूर्वी कसबा पेठ विधानसभेच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर येथे झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे हेमंत रासणे आणि सध्याचे आमदार व काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यात लढत झाली होती. त्यामध्ये धंगेकर जायंट किलर ठरले होते. तसेच त्यांनी अनेक वर्षांपासून भाजपच्या ताब्यात असलेल्या गडाला खिंडार पाडले होते.

लोकसभा निवडणुकांसाठी आज राज्यातील 11 जागांवर मतदान होत आहे. यामध्ये पुण्याच्या जागेचाही समावेश आहे.मुरलीधर मोहोळ यांना संधी दिली आहे. तर काँग्रेसने आमदार रवींद्र धंगेकर 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply