Pune- Bhusaval Train Cancelled : आजपासून तब्बल दाेन महिने भुसावळ- पुणे रेल्वे रद्द; जाणून घ्या कारण

Pune - Bhusaval Train : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील कर्जत स्थानकाच्या रीमॉडेलिंग कामासाठी विशेष ब्लॉक घेण्यात येत आहे. त्यामुळे भुसावळ-पुणे-भुसावळ (हुतात्मा एक्सप्रेस) (Bhusaval - Pune - Bhusaval Train) ही रेल्वे आजपासून (शनिवार) पुढील दोन महिने रद्द करण्यात आली आहे.

याबाबत रेल्वे प्रशासनाने प्रसिध्दीपत्राद्रवारे माहिती दिली आहे. या पत्रकात मुंबई रेल्वे विभागातील कर्जत स्थानकांवर यार्ड रिमॉडेलिंगचे काम होत असल्याने २८ जानेवारी ते ३१ मार्च दरम्यान पुणे - भुसावळ व २९ जानेवारी ते १ एप्रिल दरम्यान भुसावळ - पुणे एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्याचे म्हटले आहे.

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांनी सहकार्य करावे असे आवाहन केले आहे. दरम्यान ही रेल्वे तब्बल दाेन महिने बंद राहणार असल्याने नाशिक जिल्ह्यासह खानदेशातील प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *