Pune Bhidewada Demolished : पुण्यातील ऐतिहासिक भिडे वाडा मोठ्या पोलिस बंदोबस्तात जमीनदोस्त, उभारलं जाणार राष्ट्रीय स्मारक

Pune Bhidewada Demolished : महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी बुधवार पेठेतील भिडे वाड्यात सुरू केलेल्या मुलींच्या पहिल्या शाळेची इमारत सक्तीने ताब्यात घेण्याची कारवाई महापालिका आणि पोलिसांनी संयुक्तपणे सोमवारी (ता. ४) रात्री सुरू केली. यावेळी जेसीबीच्या सहाय्याने मोडकळीस आलेला हा धोकादायक वाडा रात्रीच्या सुमारास जमीनदोस्त करण्यात आला. पुणे महापालिका आणि पोलिसांनी गनिमी काव्याच्या मार्गाने ही कार्यवाही करत भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल पुढे पडले आहे.

फुले दांपत्याने भिडे वाड्यात १८४८ मध्ये मुलींची पहिली शाळा सुरु केली. त्याच्या स्मरणार्थ या वाड्यात राष्ट्रीय स्मारक केले जावे यासाठी महापालिकेत ठराव झाला होता.

Chennai Cyclone Michaung : चक्रीवादळामुळे चेन्नईत ५ जणांचा मृत्यू; तेलंगणासाठी रेड अलर्ट

नंतर जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु केल्यानंतर गेली १३ वर्षा उच्च न्यायालयात खटला सुरू होता. उच्च न्यायालयाने महापालिकेच्या बाजूने निर्णय दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाची हा निर्णय कायम ठेवण्यात आला. तसेच ही जागा एका महिन्याच्या आत महापालिकडे हस्तांतरित करण्याचे आदेश जागामालक व भाडे करून दिले होते.

ही मुदत ३ डिसेंबरला संपल्याने महापालिकेने आज (ता. ४) पोलिस बंदोबस्तात भूसंपादनाची प्रक्रिया सुरु केली. आज सकाळी महापालिकेच्या भूसंपादन विभागाचे अधिकाऱ्यांनी भिडे वाड्यातील जागा मालक व भाडेकरूंना नोटीस बजावण्यात आली भिडेवाड्यातील भाडेकरूंनी जागा ताब्यात देण्यासाठी मुदतवाढ द्यावी अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती ही याचिका देखील आज फेटाळून लावण्यात आली आहे.

ही जागा ताब्यात घेण्यास आणखी विलंब होऊ नये यासाठी महापालिकेने पोलिसांशी समन्वय साधून आज रात्री जागा ताब्यात घेण्यासाठी नियोजन केले. रात्री साडेनऊ वाजल्यापासूनच भेडे गाड्यांच्या परिसरात पोलीस बंदोबस्त येणार करण्यात आला. रात्री पावणे अकराच्या सुमारास पुणे महापालिकेच्या विविध क्षेत्रिय कार्यालयामधून सुमारे ५० बिगारी हातोडी पहार, कटवणी, दोरी साहित्य घेऊन यासाठी आले.

रात्री ११ च्या सुमारात वाडा ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली.

यावेळी कोणतीही अनुसूच घटना घडू नये यासाठी पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना केली होती.

असा घेतला वाडा ताब्यात

- पोलिसांकडून वाडा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू

- शिवाजी रस्त्यावरील वाहतूक थांबवली

- पदापथावरील पथदिवे, बोलार्ड काढण्यात आले.

- वाड्यावर झालेले पोस्टर, झेंडे, दुकानांच्या पाट्या काढण्यात आल्या

- जेसीबीने दुकानाच्या पाट्या करताना वाड्याचा काही भाग कोसळला

- दुकान उघडून पंचनामा करण्यात आला

- गॅस कटरने दुकानांचे शटर तोडण्याचे काम सुरू

- दोन जेसीबीच्या सहाय्याने मोडकळीस आलेला वाडा पाडण्याचे काम सुरू.

- इमारत धोकादाय झाल्याने आपोआप काही भाग कोसळत होता

- डंपर मधून वाड्याचा राडाराडा त्वरित रस्त्यावरून हटविण्याचे काम सुरू

" सर्वोच्च न्यायालयाची मुदत उलटून केल्याने महापालिकेने पोलिसांना भिडे वाडा ताब्यात घेण्याचे नियोजन केले. रात्री पोलिसांनी ही वास्तू ताब्यात घेऊन महापालिकेकडे हस्तांतरित केली. यासाठी कायदेशीर प्रक्रिया पार पाडताना नियमांचे पालन करण्यात आलेले आहे. ही कार्यवाही शांततेत पार पडली."

- विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त

आराखडा तयार करण्याचे काम सुरु

महापालिकेने भिडे वाड्यामध्ये राष्ट्रीय स्मारक करताना महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा उचित गौरव करण्यासाठी स्मारकाचा आराखडा तयार करण्याचे काम सुरु केले आहे. त्यासाठी तीन वास्तूविशारदांकडे जबाबदारी देण्यात आली आहे. पुढील काही आठवड्यामध्ये या ठिकाणी स्मारकाच्या कामाचे भूमीपूजन करण्यासाठी महापालिका प्रशासनाने तयारी सुरु केली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply