Amitesh Kumar : अमितेश कुमार पुण्याचे नवीन पोलीस आयुक्त

Pune : पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी नव्याने अमितेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अमितेश कुमार यांची सप्टेंबर २०२० रोजी नागपूर पोलीस आयुक्त म्हणून निवड करण्यात आली होती. त्यानंतर आज बुधवारी अमितेश कुमार यांची पुण्याच्या नवीन पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

अमितेश कुमार यांची पुण्याचे नवीन पोलीस आयुक्त नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूरच्या आयुक्तपदी सर्वाधिक काळ राहण्याचा विक्रम त्यांच्या नावार आहे. १९९५ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी अमितेश कुमार यांनी औरंगाबाद शहराचे पोलीस आयुक्त म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. तसेच त्यांनी मुंबई वाहतूक पोलीस शाखेच्या सहआयुक्त म्हणूनही काम केलं आहे.

Follow us -

Sharad Mohol Case Update : शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश मारणेला अखेर अटक, पुणे पोलिसांची मोठी कारवाई

नागपूर पोलीस आयुक्त होण्याआधी अमितेश कुमार हे राज्य गुप्तवार्ता विभागात सहआयुक्त म्हणून कार्यरत होते.

२००७ मध्ये भारत विरुद्ध क्रिकेट सामना खेळत असताना वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू मरलोन सॅम्युअल आणि कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक मनोज कोचर यांच्यामधील होणारी बातचीत रेकॉर्ड करून क्रिकेट विश्वात खळबळ उडाली होती. या कामगिरीमुळे अमितेश कुमार यांची संपूर्ण राज्यात चर्चा झाली होती.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply