Pune Airport : पुणे विमानतळाचा प्रश्न शहांच्या दरबारी; नागरी हवाई वाहतूक राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांची बैठक

Pune Airport : पुणे विमानतळाचे नवे टर्मिनल व गेल्या महिन्याभरापासून 'पार्किंग बे'वर असलेल्या अपघातग्रस्त विमानाचा प्रश्न थेट देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या दरबारी पोहोचला आहे. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारताच मुरलीधर मोहोळ यांनी शहा यांच्याबरोबर बैठक घेतली.

नवे टर्मिनल कार्यान्वित करणे, अपघातग्रस्त विमान 'बे'वरून हटविणे आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचा निधी पुणे महापालिकेला मिळवून देणे, अशा विषयांसंदर्भात त्यांनी सविस्तर चर्चा केली.

Pune Car Accident : ससून ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरण, विशाल-शिवानी अग्रवालसह अश्फाक मकानदारची येरवडा कारागृहात रवानगी

नव्या टर्मिनलचे उद्‌ घाटन आठ मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यास तीन महिने उलटले तरी प्रवाशांसाठी ते खुले झाले नसल्याने पुणेकरांनी नाराजी व्यक्त केली होती. पार्किंग बे क्रमांक १ बंद झाल्याने प्रवाशांना फटका बसत असल्याची बातमी ११ जूनच्या अंकात दैनिक 'सकाळ'ने प्रसिद्ध केली होती. त्याची दखल घेत मोहोळ यांनी शहा यांच्याशी चर्चा केली. यावर शहा यांनी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.

'सीआयएसएफ'ची नियुक्ती लवकरच

नवे टर्मिनल लवकरच सुरू करण्यासंदर्भात हालचाली सुरु झाल्या आहेत. तेथे २४१ जवानांची नियुक्ती केली जाईल. याबाबतच्या आदेशाची फाइल सध्या केंद्रीय गृह मंत्रालयात आहे.

या संदर्भात मोहोळ यांनी शहा यांच्याशी सविस्तर चर्चा केली. गृहमंत्रालयाच्या अखत्यारितील 'सीआयएसएफ'च्या मनुष्यबळाची पूर्तता लवकरच करण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय झाला आहे. त्यामुळे नवे टर्मिनल लवकरच प्रवासी सेवेत दाखल होण्याची आशा आहे.

बे'वरचे विमान हलणार

दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला १६ मे रोजी पुणे विमानतळावर अपघात झाला. त्यानंतर 'डीजीसीए'कडू विमानाची होणार होती. मात्र अद्याप तपासणी झाली नसल्याने विमान 'बे' वरच आहे. त्याचा परिणाम इतर विमानांच्या प्रवासी वाहतुकीवर झाला आहे. हा 'बे' वापरात नसल्यामुळे विमानांचे वेळापत्रक कोलमडत आहे.

विमान दुरुस्तीसाठी आणखी काही काळ लागण्याची शक्यता असून ते विमान तात्पुरत्या स्वरूपात संरक्षण दलाच्या जागेवर हलविण्याचा पर्याय उपलब्ध आहे. याबाबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याचे मोहोळ यांनी सांगितले.

आपत्ती व्यवस्थापनाचा निधी लवकरच

पुणे शहरातील पूर परिस्थिती नियंत्रणासाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाकडून येणारा निधी काही काळ प्रलंबित होता. शहा यांच्या गृहमंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापानातून मिळालेल्या या निधीतून शहरभर विविध कामे केली जातील.

शहरातील पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याचे नियोजन व पूर नियंत्रणासाठी हा निधी तत्काळ मिळावा, असा मुद्दा बैठकीत मांडला असता शाह यांनी सकारात्मकता दर्शवली आणि तातडीने निधी वर्ग केला जाईल, असे सांगितल्याचे यांनी नमूद केले.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply