Pune Accident News: पुण्यात भरधाव रुग्णावाहिकेने ट्रकला धडक दिल्याने रुग्णवाहिकेतील १४ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Pune Accident News : पुण्यातून अपघाताची मोठी घटना समोर आली आहे. पुण्यात भरधाव रुग्णावाहिकेने ट्रकला धडक दिल्याने रुग्णवाहिकेतील १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील आंबेगाव बुद्रूक परिसरात जांभूळवाडी रस्त्यावर ही घटना घडली आहे

मिळालेल्या माहितीनुसार,पुण्यातील आंबेगाव बुद्रूक परिसरात भरधाव रुग्णवाहिका ट्रकवर पाठीमागून आदळल्याने रुग्णवाहिकेतील १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तर या अपघातात रुग्णवाहिकेचा चालक गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. तर या मुलाचे तिघे नातेवाई किरकोळ जखमी झाले आहेत.

Maratha Reservation : आरक्षणाला विरोध नाही, पण आमचे आरक्षण हिरावू नका; कल्याण तालुका ओबीसी महासंघाची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रूक परिसरात जांभूळवाडी रस्त्यावरील दरी पुलाजवळ मंगळवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या अपघातात किरण अंकुश अवताडे या १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे.

तर रुग्णवाहिका चालक सद्दाम सुतार हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सातारा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याचबरोबर अनिता अवताडे, अंकुश अवताडे आणि सुखदेव अवताडे हे किरकोळ जखमी झाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply