Pune Accident : खराडी चंदननगर परिसरात मोहरीच्या तेलाचा टँकर बीआरटी मार्गात पलटी झाल्याने ट्रॅफिक जाम, अग्निशमन दल दाखल

Pune Accident : अहमदनगर रस्त्यावर खराडी चंदननगर परिसरात एक मोहरीच्या तेलाचा टँकर बीआरटी मार्गात पलटी झाला आहे. पलटी झालेल्या टँकरचा चालक पळून गेला असून टँकरमधील निम्मे तेल नगर रस्त्यावर वाहून आले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली असून अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. 

अग्निशामक दलाकडे मनुष्यबळ कमी असल्यामुळे या तेलावर माती टाकण्यासाठी वेळ लागण्याची शक्यता आहे. तेल दूरपर्यंत वाहून जात असल्यामुळे अपघाताची शक्यता आहे. यामुळे परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. रस्त्यावर तेल सांडल्यामुळे अपघाताची शक्यता आहे.

तेल सांडलेल्या जागेवर माती टाकण्याचे काम सुरू आहे. परिसरातील वाहतूक मंदावली आहे. तर वाहने सावकाश चालवण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तर पलटी झालेल्या टँकरचा चालक पळून गेला आहे. बीआरटी मार्गावरअपघात होऊन एक ऑईलचा टँकर पलटी झाला आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *