Accident News : दुर्दैवी! पुण्यातील मुठानदीच्या पुलावर भीषण अपघात; मुलीचा जागीच मृत्यू

खडकवासला : बाह्यवळण महामार्गावर वारजे येथील मुठा नदीच्या पुलावर झालेल्या अपघातात दुचाकी चालक तरुण मुलीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री नऊ वाजून ५० मिनिटांनी घडली आहे. अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

ऋतुजा दिलीप वायकर (वय- 23, रा.नऱ्हे आंबेगाव) असे त्या महिलेचे नाव आहे. ती बावधन येथून महामार्गावरून घरी निघाली होती. अशी माहिती वारजे पोलिस ठाण्याचे निरीक्षक दगडू हाके यांनी दिली.

अद्याप अपघाताची माहिती देणारी व्यक्ती कोणी नाही. त्यामुळे, अपघात कसा घडला याचा तपास केला जात आहे. त्या मुलीच्या वाहनांचा पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे. त्यावरून, अज्ञात वाहनाने धडक दिली असावी. असा अंदाज पोलिस निरीक्षक दगडू हाके यांनी व्यक्त केला.

'अपघातानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती घटनेतील वाहने बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली जात आहे. दरम्यान, दुचाकीच्या क्रमांकावरून तिच्या वडिलांशी संपर्क झाला. ते तातडीने घटनास्थळी पोचले. तिला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेले. त्यावेळी तिचे वडील सोबत गेले आहेत.' अशी माहिती वारजे वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक विशाल पवार यांनी दिली



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *