Pune Accident : पुण्यात भीषण अपघात, भर रस्त्यात वेगात येणाऱ्या कारनं चिरडलं अन्...; लेकीची वाट पाहणाऱ्या कुटुंबाचा मन हेलावणारा आक्रोश

Pune : पुण्याच्या कात्रजमधील सुखसागरनगरमध्ये भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. एका भरधाव येणाऱ्या व्हॅगनार कारने एका तरुणीला चिरडले आहे. या अपघातात तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतले आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रेया गौतम येवले (वय २१) या तरुणीचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. ही तरुणी शीतल हाईट्स, खंडोबा मंदिराजवळ, कोंढवा येथे राहत होती. कात्रजमधील सुखसागरनगर येथे तिला व्हॅगनार कार चिरडले. या कार अपघातामध्ये श्रेया येवले या तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे.

Mumbai : मेहनतीने आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं, पण नियतीने घात केला; डोंबिवलीतील क्रू मेंबर रोशनीचा मृत्यू

कार अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी कार चालक सतीश गुरुनाथ होनमाने (वय ३७) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तो गोकुळनगरचा रहिवासी असल्याचे म्हटले जात आहे. भरधाव कारने दिवसाढवळ्या तरुणीला चिरडल्याने कात्रज परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply