Pune Accident : पुण्यात ब्रेक फेल झाल्यानं शिवशाही बसचा विचीत्र अपघात

Pune Accident News : पुण्यात शिवशाही बसचा विचित्र अपघात समोर आला आहे. ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला आहे. बसमध्ये एकूण 25 प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने सर्व प्रवासी सुखरुप आहेत. आज सकाळी संगमवाडीच्या बाळासाहेब ठाकरे चौकात हा अपघात झाला आहे.

एसटीच्या शिवशाही बसचा ब्रेक फेल झाल्यानंतर थेट फुटपाथवर चढून बाजूला असलेल्या झाडावर जाऊन आदळली. बसचं या धडकेत मोठं नुकसान झालं आहे तर झाड देखील कोसळलं आहे.
 
एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास, असं म्हटलं जातं. मात्र खरंच एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास राहिलाय का? असा सवाल उपस्थित होत आहे. कारण एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ मध्ये शिवशाहीचे सुमारे २२१ अपघात झाले. त्याआधीच्या वर्षी ही संख्या २४० होती. सध्या एसटीच्या ताफ्यात मालकीच्या ९०० बस आणि भाडेतत्वावरील ४०० बस आहेत. 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply