Pune Accident News : लोणीकंद-थेऊर अष्टविनायक महामार्गावर भीषण अपघात; तिघे मृत्यूमुखी, एकाची मृत्यूशी झुंज

Pune Accident News : लोणीकंद-थेऊर अष्टविनायक महामार्गावर बकोरी फाट्याजवळ रविवारी जोगेश्वरी मंदीरा समोर कंटेनर व कार मध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेत सात जण जखमी झाले हाेते. यापैकी तिघांचा मृत्यू झाला. या अपघातामधील गंभीर जखमीची मृत्यूशी झुंज सुरु असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार विनोद भोजणे, विठ्ठल जोगदंड आणि गणेश जाधव अशी मृतांची नावे आहेत. 

रविवारी रात्रीच्या सुमारास लोणीकंद-थेऊर या अष्टविनायक महामार्गावर हा अपघात झाला हाेता. या भीषण अपघातात कारचा चक्काचूर झाला. या घटनेनंतर जखमींना तातडीने वाघोली व खराडी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Mumbai News : मुंबईत चिकन शोर्मा खाऊन 12 जणांना विषबाधा, रुग्णालयात उपचार सुरू

या अपघातात कारचा चालक अपघातग्रस्त गाडीतच अडकून पडला होता. लोणीकंद पोलिस व स्थानिक नागरिकांनी त्याला बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. दरम्यान अपघातामधील तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

छाेटे माेठे अपघात घडताहेत

जोगेश्वरी मंदिरा समोर मोठे वळण आहे. वनविभागाने तेथे संरक्षक जाळी बसविल्याने वळण तीव्र झाले आहे. यामुळे तेथे नेहमी छोटे मोठे अपघात होत असल्याचे तेथील रहिवासी व माहिती अधिकारी कार्यकर्ते चंद्रकांत वारघडे यांनी सांगितले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply