Pune Accident News : वरंध घाटात कार ९० फूट खोल दरीत कोसळली; दैव चांगले म्हणून तिघे बचावले

पुणे : पुण्याहून महाडला जाणाऱ्या मार्गावर वरंध घाटात कार ९० फूट खोल दरीत गेल्याची घटना घडली आहे. गाडीतून धूर निघत असल्यानं गाडी रस्त्याच्या बाजूला उभी करून तिघे प्रवासी गाडीतून खाली उतरले असताना गाडी दरीत कोसळली. 

पुण्याहून महाडला जाणाऱ्या मार्गावरील वरंध घाटात उंबर्डे गावाच्या हद्दीत हि घटना घडली आहे. गाडी पुण्याहून महाडच्या दिशेने जात असताना उंबर्डे गावाजवळ गाडीतून धूर निघत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्यानंतर चालकाने गाडी रस्त्याच्या बाजूला उभी केली. यानंतर गाडीत काय बिघाड झाला हे तपासणी करण्यासाठी तिघे प्रवासी गाडीतून खाली उतरले.

Pune Nashik Highway : टोल कर्मचारी यांच्याकडुन आरेरावी; पुणे- नाशिक टोलनाक्यांवरील प्रकार

सुदैवाने तिघे बचावले 

हँडब्रेक लावला नसल्याने गाडी उताराने जाऊन अचानक दरीत कोसळली. सुदैवाने गाडीत कुणी नसल्याने यात कुणीही जखमी झालं नाही. मात्र यात गाडीचं मोठं नुकसान झालंयं. घाटामध्ये अनेक ठिकाणी रस्त्याच्या बाजूला संरक्षक कठडे नसल्यानं वारंवार गाडी दरीत कोसळत असल्याच्या घटना घडत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply