
Pune Accident News : पुण्यातील प्रसिद्ध झेड ब्रिजजवळ शुक्रवारी रात्रीच्या सुमारास एक थरकाप उडवणारी घटना घडली. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका कारचालकाने रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की यामध्ये एकाचा मृत्यू झाला. तर तीन ते चार जण जखमी झाल्याची प्राथामिक माहिती आहे.
अपघाताची माहिती मिळताच पुणे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून पोलिसांनी दारुड्या कारचालकासह त्याच्या सहकाऱ्याला अटक केली आहे. या भयानक घटनेनं पुणेकरांना संतोष माने घटनेची आठवण करुन दिली आहे.
|
|
विश्वनाथ उपादे, असं अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचं नाव आहे. तर उमेश हनुमंत वाघमारे (वय ४८ वर्ष) असे कारचालकाचे नाव असून नटराज बाबुराव सूर्यवंशी (वय ४४ वर्ष) असे गाडीमालकाचे नाव आहे. या दोघांना विश्रामबाग पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी उमेश हनुमंत वाघमारे आणि त्याचा मित्र नटराज हे दोघे दारू पिऊन बेफामपणे गाडी चालवत होते. दरम्यान, कार अलका चौक मार्गावर आली असता उमेश याचा गाडीवरचा ताबा सुटला आणि कारने रस्त्यावर जात असणाऱ्या विश्वनाथ उपादे यांना उडवले.
यानंतर कारने दोन दुचाकी आणि एका प्रवासी रिक्षाला जोरदार धडक देत शेवटी एका लाईटच्या पोलाला जाऊन धडकली. यामध्ये पायी चालत जाणाऱ्या विश्वनाथ उपादे यांचा मृत्यू झाला तर दोन ते तीन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. अपघातानंतर रस्त्यावर मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत कारचालक आणि त्याच्या सहकाऱ्याला ताब्यात घेतलं.
शहर
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
महाराष्ट्र
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना



























Subscribe to my channel

