Pune Accident : राहुल टॉकीजसमोरील पुलावर दुधाच्या टेम्पोचा अपघात; चालक जखमी

Pune Accident - शिवाजीनगर येथे राहुल टॉकीजच्या समोर असलेल्या पुलावर दुधाच्या टेम्पोचा अपघात झाला. यामुळे शेकडो लिटर दूध रस्त्यावर सांडले आहे. तसेच ऑइलदेखील सांडल्याने रस्ता निसरडा झाला आहे.

अपघातात टेम्पो चालक जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो थेट पुलावरील दुभाजकाला जाऊन धडकला. त्यामुळे टेम्पोमधील दूध रस्त्यावर सांडले.

Follow us -

आज सकाळी आठच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातामुळे युनिव्हर्सिटी रस्तावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. मात्र, पोलिसांनी येथील वाहतूक कोंडी सुरुळीत केली.

Pune-Mumbai Transport : पुणे-मुंबई प्रवास आता अधिक वेगवान; नवीन दोन लेन तयार होणार; आठ लेनवरून होणार वाहतूक

हा टेम्पो बाजूला करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, पुलावरील रस्ता निसरडा झाल्याने या रस्त्याने वाहने चालविताना काळजी घ्यावी, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशामक दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply