Pune Accident : पुण्यात हिट अँड रनचा थरार! भरधाव कारची दुचाकीला धडक; मुलाचा मृत्यू, आईची प्रकृती गंभीर

Pune : पुण्यातून अपघाताची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात एका कारने दुचाकीला जोरदार धडक मारली. धडकेमुळे दुचाकीवर बसलेला तरुण आणि त्याच्या आईला गंभीर दुखापत झाली. अपघात झाल्यानंतर आसपासच्या लोकांना मायलेकाला रुग्णालगात दाखल करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, धानोरीच्या भैरवनगरमधील आनंद पार्कमध्ये राहणारा मयूर पिंपळे (वय २८) हा तरुण त्याच्या आईसोबत दुचाकीवरुन प्रवास करत होता. ते दोघे आनंद पार्क परिसरातून दुचाकीवरुन सकाळी नऊ-पावेण नऊच्या सुमारास निघाले होते. अचानक वेगाने येणाऱ्या कारने दुचाकीला जोरात धडक मारली.

कारची धडक इतकी जोरदार होती, की मयूरला गंभीर दुखापत झाली. मागे बसलेली मयूरची आई देखील जखमी झाली. दोघांनाही उपचारांसाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना मयूरचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी कार चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune : पुण्याच्या मुळशीतील व्यक्तीनं आयुष्य संपवलं, पडिक इमारतीत लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयूर आणि त्याची आई हे शांतपणे दुचाकीवरुन चालले होते. पण त्यांना भरधाव येणाऱ्या कारने जोरात टक्कर मारली. अपघातात मयूर गंभीररित्या जखमी झाला, त्याच्या आईला देखील दुखापत झाली. रुग्णालयात मयूरचा मृत्यू झाला. याबाबत पोलीस हवालदार जितेंद्र कांबळे यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, चालकाचा शोध सुरु असल्याचे म्हटले जात आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *