Pune Accident : वर्षश्राद्ध करून घरी परतताना काळाचा घाला, माजी उपसरपंचाचा अपघाती मृत्यू

Pune Accident : पुणे जिल्ह्यातील सणसवाडी गावाचे माजी उपसरपंच दत्तात्रय हरगुडे यांचं अपघाती निधन झालं आहे. पुणे-नगर महामार्गावर भरधाव कारने माजी उपसरपंच दत्तात्रय हरगुडे यांना धडक दिली. यानंतर माजी उपसरपंच दत्तात्रय हरगुडे गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर रुग्णालयात हरगुडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हरगुडे यांच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे.

अपघात कसा झाला ?

पुणे-नगर महामार्गावर पायी चालणाऱ्या दोघांना भरधाव कारने पाठीमागून धडक दिली. या अपघातात माजी उपसरपंच हरगुडे हे गंभीर जखमी झाले. गरगुडे यांच्या डोक्याला जबर मार लागला. या अपघातानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केलं. मात्र, उपचारादरम्यान गरगुडे यांचा मृत्यू झाला. माजी उपसरपंच हरगुडे यांच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे.

Mumbai News : ऑनलाईन आईसस्क्रिम मागवताय, सावधान! आईसस्क्रीममध्ये सापडलं माणसाचं बोट


नेमकं काय घडलं?

सणसवाडी येथील माजी उपसरपंच दत्तात्रय हरगुडे यांनी सणसवाडी येथील एका वर्षश्राद्ध कार्यक्रमाला हजेरी लावली. वर्षश्राद्धाचा कार्यक्रम आटोपून पुणे दिशेने निघाले होते. पुण्याच्या दिशेने जाण्यासाठी गाडी जवळ जात असताना मागून आलेल्या भरधाव कारने धडक दिली. भरधाव कारने गरगुडे आणि एकाला धडक दिली.

भरधाव कारच्या धडकेमुळे दोघेही गंभीर झाले. अपघात झाल्यानंतर हरगुडे यांच्यावर खराडी येथील मनिपल रुग्णालायत उपचार सुरु होते. उपचारादरम्यान, हरगुडे यांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने सणसवाडीसह परिसरात शोककळा पसरली आहे.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply