Pune Accident : पुणे हिट अँड रन प्रकरणात मोठी अपडेट; गुन्हा दाखल होताच आरोपीचे वडील पसार, पोलिसांकडून शोध सुरू

Pune Accident : पुणे हिट अँड रन प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. अल्पवयीन मुलाच्या हातात कार दिल्याने पुणे पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मात्र, गुन्हा दाखल होताच विशाल अग्रवाल नॉट रिचेबल झाले आहेत. ते पसार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सध्या पोलीस विशाल अग्रवाल यांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी वेगवेगळी पथके रवाना केली आहे. विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने दारुच्या नशेत सुसाट कार चालवत दुचाकीस्वारांना उडवलं होतं. या अपघातात तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू झाला.

Uddhav Thackeray : पहाटे 5 वाजले तरी मतदान करा, रांगेतून हटू नका; उद्धव ठाकरे यांचं मतदारांना आवाहन

अश्विनी कोष्टा, अनिस अवधिया, अशी मृतांची नावे आहेत. पुण्यातील कल्याणीनगर परिसरात शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी विशाल अग्रवाल यांचा मुलगा वेदांत अग्रवाल याला ताब्यात घेतलं होतं.

पण वेदांत हा अल्पवयीन असल्याचे कारण देत न्यायालयाकडून त्याला जामीन मंजूर करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी वेदांतच्या हातात कार दिल्याप्रकरणी विशाल अग्रवाल यांच्यावरही गुन्हा दाखल केला. मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतर ते नॉट रिचेबल झाले आहेत.

पोलिसांनी विशाल अग्रवाल यांच्यासोबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, अग्रवाल यांचा फोन नॉट रिचेबल येत आहे. ते फरार झाले असावेत, असा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी वेगवेगळी पथके रवाना केली आहेत.

दरम्यान, विशाल अग्रवाल यांच्या मुलाला अटक केल्यानंतर पोलिसांकडून त्याला विशेष वागणूक देण्यात आली, असा आरोप होत आहे. या आरोपाची गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे.

आरोपीला कोणती विशेष वागणूक दिली असल्यास, सदरील पोलीस स्टेशनमधील सीसीटीव्ही तपासण्यात यावेत. झालेला आरोप खरा असेल, तर तत्काळ संबंधित पोलिसांवर निलंबनाची कारवाई करा, असे आदेश देवेंद्र फडणवीसांनी दिले आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply