Pune Accident : पुणेकरांना पुन्हा 'संतोष माने'ची आठवण, मद्यधुंद PMPML चालकाने १०- १५ वाहनांना उडवले, थरारक VIDEO

Pune Accident : पुणे शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यात पीएमपीएल बस चालकाने १५ गाड्यांना धडक दिल्याची घटना घडली. शहरातील सेनापती बापट रोडवर असलेल्या वेताळबाबा चौकामध्ये या चालकाने बेदरकारपणे बस चालवत १५ गाड्यांना उडवले. मद्यधुंद अवस्थेत त्याने हा प्रकार केल्याचे सांगण्यात येत आहे.

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील सेनापती बापट रोडवर वेताळबाबा चौकामध्ये एका बसचालकाने १०- १५ वाहनांना उडवल्याची घटना समोर आली आहे. एका वाहन चालकाशी वाद झाल्यानंतर या बसचालकाने रॉंग साईडने बेदरकारपणे रिव्हर्समध्ये बस पळवत १०- १५ वाहनांना जोरदार धडक दिली.

Jejuri Khandoba Mandir : जेजुरीच्या खंडोबा मंदिराचा मुख्य गाभारा दीड महिन्यांनी दर्शनासाठी खुला; गडावर भाविकांची अलोट गर्दी

निलेश सावंत असे या बस चालकाचे नाव असून दारुच्या नशेत त्याने हे कृत्य केल्याचे सांगण्यात येत आहे. या बसमध्ये एकूण ५० प्रवासी होते. हा सगळा प्रकार लक्षात येताच प्रवाशांनी आरडाओरडा करण्यास सुरूवात केली. मात्र या बसचालकाने प्रवाशांच्या जीवाची पर्वा न करता वेगाने बस चालवत वाहनांना धडक दिली.

या घटनेत काही प्रवासी जखमी झाल्याचे सांगण्यात येत असून जखमींचा निश्चित आकडा अद्याप समोर आला नाही. या प्रकरणी चतुश्रुंगी पोलीस ठाण्यात चालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply