Pune Accident नियंत्रण सुटले, कार थेट विहिरीत कोसळली; चालकाचा मृत्‍यू

शिरूर (पुणे) : शिरुर तालुक्यातील आण्णापुर गावात काळजाचा ठोका चुकविणारी दुदैवी घटना घडली आहे. भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्‍याने कार थेट विहिरीत जावून पडली. यात चालकाचा जागीच मृत्‍यू झाला. 

रस्त्याने जात असताना कार चालकाचे कारवरील अचानक नियंत्रण सुटले. यामुळे कार अनियंत्रीत झाल्‍याने कार थेट चालकासह विहिरीत जाऊन कोसळली.विहिरीत पाणी असल्‍याने कार चालकाला बाहेर निघता आले नाही. यात चालकाचा पाण्यात बुडून दुर्दैवीरित्या मृत्यू झाला. राहुल पठाडे असे मृत कार चालकाचे नाव आहे.

कार विहिरीत पडल्‍याची बातमी परिसरात लागलीच पसरली. यानंतर स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या मदतीने कारसह चालकाचा विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. यावेळी कार चालकाच्या मृत्युमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *