Pune : कामशेतमधील आदिवासी पाड्यावरील चिमुरड्यांसाठी ‘ससून’ बनले ‘माय’!

Pune : कामशेतमधील राऊतवाडी येथील आदिवासी पाड्यावरील गर्भवती आणि तिची दोन मुले दूषित पाण्यामुळे गंभीररित्या आजारी पडली. अतिसारामुळे त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना ससून सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी महिलेवर उपचार करीत असतानाच तिच्या दोन मुलांवर स्वतंत्रपणे उपचार केले. या कालावधीत कर्मचारीच या मुलांची पालकांप्रमाणे काळजी घेत होते.

राऊतवाडी येथील आदिवासी पाड्यावर दूषित पाण्यामुळे एकाच कुटुंबातील तिघे आजारी पडले. त्यात सात महिन्यांती गर्भवती आणि तिचा २ वर्षांचा मुलगा आणि ७ वर्षांची मुलगी यांचा समावेश होते. अतिसारामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. या तिघांचे कुपोषण होऊन त्यांच्या मूत्रपिंडाचा त्रासही सुरू झाला होता. रुग्णवाहिकेतून या तिघांना ससून रुग्णालयात २ जुलैला दाखल करण्यात आले. या महिलेला स्त्रीरोग विभागात तर मुलांना बालरोग विभागात दाखल करण्यात आले.

Maharashtra Rain News : राज्यात चार दिवस पावसाचा जोर कमी



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply