Pune : मुठा नदीपात्रात वाहून गेलेल्या शाळकरी मुलाचा आज पुन्हा शोध सुरू

Pune  : मुठा नदीच्या पूना हॉस्पिटलजवळील पात्रात सोमवारी सायंकाळी एक शाळकरी मुलगा वाहून गेला. वाहून गेलेल्या मुलाचा शोध लागला नाही. अग्निशमन दलाच्या जवानांकडून मंगळवारी सकाळी मुठा नदीपात्रात बुडालेल्या शोध घेण्यास सुरूवात करण्यात आली आहे. मुठा नदीपात्रात संगम पूल, डेंगळे पूल परिसरात मुलाचा शोध घेण्यात येत आहे.

खडकवासला धरण साखळीत संततधार असल्याने रविवारी रात्री मुठा नदीत मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आले. धरणातून विसर्ग सुरू झाल्यानंतर सोमवारी सकाळी भिडे आणि शिवणेमधील पूल पुन्हा पाण्याखाली गेला. धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. भिडे पुलावरून पाणी वाहू लागल्याने पोलिसांनी पुलाच्या दोन्ही बाजूस तात्पुरते कठडे उभे करून पूल वाहतुकीस बंद केला होता.

Pune Flood : महापालिका निवडणुकाच नाहीत, प्रशासनाशी कोण बोलणार? जबाबदारी कोणाची? राज ठाकरे यांनी सरकारला सुनावले

पूना हॉस्पिटलजवळील एसएम जोशी पुलाच्या पात्रातही मोठ्या प्रमाणावर पाणी होते. तेथील एका बाकड्यावर एक शाळकरी मुलगा बसला होता. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तो अचानक नदीपात्रात पडला असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यामुळे अनेकांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. तातडीने अग्निशामक दलाला या घटनेची माहिती देण्यात आली.

या दलाच्या जवानांनी तातडीने मुलाचा शोध घ्यायला सुरुवात केली. मात्र, रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध लागू शकला नाही. त्यानंतर मंगळवारी सकाळपासून अग्निशमन दलाच्या जवानांनी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. महापालिका भवन, डेंगळे पूल, संगम पूल परिसरातील नदीपात्रात जवानांकडून शोध घेण्यात येत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *