Pune Temperature News : धूलिवंदनाला उच्चांकी तापमान ; पाऱ्याची सरासरी २.७ अंश सेल्सिअसने उसळी

पुणे : होळीनंतर दुसऱ्याच दिवशी सोमवारी पुण्यात यंदाच्या उन्हाळ्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. धूलिवंदनाच्या दिवशी शिवाजीनगर येथील वेधशाळेत ३८.९ अंश सेल्सिअस इतके आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान नोंदले गेले. राज्यात सर्वाधिक ४१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद अकोला येथे झाली.

होळीच्या दिवशी म्हणजे शनिवारी (ता. २४) ३७.७ अंश सेल्सिअस तापमान होते. होळीनंतर उन्हाचा चटका वाढतो. त्यामुळे धूलिवंदनाच्या दिवशी पाऱ्याने सरासरीपेक्षा २.७ अंश सेल्सिअसने उसळी घेतली. गेल्या वर्षी २९ मार्चला उच्चांकी म्हणजे ३५.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले होते. त्यामुळे पुण्यात यंदा उन्हाचा चटका जास्त असल्याचे निरीक्षण हवामान खात्यातर्फे नोंदविण्यात आले. पुण्यात मार्चमध्ये आतापर्यंतचे सर्वाधिक उच्चांकी तापमान १८९२ मध्ये नोंदविले गेले होते. त्या वर्षी ४२.८ अंश सेल्सिअसपर्यंत कमाल तापमानाचा पाऱ्याने उसळी मारली.

दिवसभर उन्हाचा चटका

शहरात सकाळी दहा वाजल्यापासूनच उन्हाचा चटका लागत होता. अशा भर उन्हात रंग खेळणाऱ्या तरुणाई रस्त्या-रस्त्यांवर दिसत होते. मात्र, दुपारनंतर उन्हाची तीव्रता आणखी वाढल्याने रस्त्यावर शुकशुकाट होता. कामानिमित्त बाहेर पडणारे पुणेकर टोपी, गॉगल घालून बाहेर पडत असल्याचे चित्र रस्त्यावर दिसत होते. शीतपेयांच्या दुकानांवर गर्दी वाढली वाढली होती. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत उन्हाचा चटका कायम होता.

Buldhana Clash : बुलडाण्यात होळी दहनाच्या वेळीच तुफान राडा; दोन गटांची लाठाकाठ्यांनी हाणामारी, ५ जणांची प्रकृती गंभीर

रात्रीचा उकाडा वाढला

शिवाजीनगर येथे किमान तापमान सरासरीच्या तुलनेत २.४ अंश सेल्सिअसने वाढून १८.९ अंश सेल्सिअस नोंदले गेले. यंदाच्या उन्हाळ्यातील हे आतापर्यंतचे सर्वाधिक किमान तापमान ठरले. त्यामुळे रात्रीचा उकाडा वाढला आहे. वडगाव शेरीमध्ये २४.९, मगरपट्टा येथे २४.२, कोरेगाव पार्कमध्ये २३.५, हडपसरमध्ये २२.६ अंश सेल्सिअस किमान तापमान होते. शहर परिसरात एनडीए येथे सर्वांत कमी म्हणजे १८.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

पुणे परिसरातील कमाल तापमान

अंश सेल्सिअसमध्ये

  • शिवाजीनगर ........ ३८.९

  • पाषाण .............. ३८.४

  • लोहगाव ............ ३८.६

  • मगरपट्टा ............. ३८.६

अंदाज असा

शहर आणि परिसरात पुढील दोन दिवस आकाश निरभ्र राहण्याची शक्यता कमाल तापमानाचा पारा वाढून ३८ अंश सेल्सिअस जाण्याची शक्यता शहरात शुक्रवारी दुपारनंतर (ता. २९) आकाश अंशतः ढगाळ राहाण्याची शक्यता असल्याने किमान तापमानात अंशतः वाढ अपेक्षित



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply