
Pune : महाराष्ट्रभरात मुसळधार पाऊस सुरू आहे. पुण्यातही पावसाची संसतधार असून काही ठिकाणी पूरसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. सततच्या पावसामुळे अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली असून काही ठिकाणी भूस्खलन झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. पुण्यात पावसाच्या काही दुर्घटनांमध्ये आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्यात एका दुर्घटनेत विजेचा धक्का लागून तीन जणांचा मृत्यू झाला. तर मावळ तहसील येथील आदरवाडी गावात भूस्खलन झाल्याने एका हॉटेल कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी झाला आहे.
मुसळधार पावसामुळे पुणे शहर आणि आजूबाजूच्या भागातील शाळा बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पिंपरी, चिंचवड, भोर, वेल्हे, मावळ, मुळशी आणि खडकवासला येथील शाळा बंद राहणार आहेत. त्याशिवाय पुण्यातील सर्व पर्यटन स्थळंही बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. खासगी कार्यलयांनाही असे आदेश देण्यात आले आहेत.
|
|
एनडीआरएफच्या टीम तैनात
पुण्यात मुसळधार पावसामुळे अग्निशमन दलाचे २०० हून अधिक जवान आणि अधिकारी शहरातील विविध भागात तैनात करण्यात आले आहेत. सखल भागात असलेल्या घरं आणि इमारतींमध्ये अडकलेल्या सुमारे १६० लोकांना अग्निशमन दलाने सुखरुप घराबाहेर काढून सुरक्षितस्थळी हलवलं आहे. एनडीआरएफच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रोड परिसरातील एकता नगरमध्ये पाणी साचल्याने अनेक लोक घरात अडकले आहेत, या नागरिकांसाठी एनडीआरएफची दोन पथकं रवाना करण्यात आली आहेत.
प्रशासनाच्या विनंतीवरुन तळेगाव येथील एनडीआरएफच्या पाचव्या बटालियनकडून पथकं पाठवण्यात आली आहेत. पुण्यातील वारजे परिसरात एनडीआरएफची तिसरी टीम तैनात करण्यात आली आहे. पूरग्रस्त भागात अडकलेल्या स्थानिक लोकांना वाचवण्यासाठी एनडीआरएफ आणि भारतीय लष्कराचं पथक पुण्यातील एकता नगरमध्ये मदतकार्य सुरू आहे. पुण्यात पावसाने थैमान घातलं असून अनेक भागातील घरांमध्ये पाणी शिरलं आहे. जनजीवन विस्कळित झालं असून अनेक नागरिकांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागत आहे. स्थानिक प्रशासन, अग्निशमन दल, पोलीस बचाव कार्य करत असून पावसामुळे प्रभावित झालेल्या लोकांना मदत केली जात आहे.
पवना धरण ५८ टक्के भरलं
पुण्यात पावसाची संततधार सुरू असून अनेक नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. मुसळधार पावसामुळे पिंपरी-चिंचवडला पाणी पुरवणारा पवना धरण बुधवारी दुपारपर्यंत आपल्या क्षमतेच्या ५८ टक्के भरलं आहे.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

























Subscribe to my channel

