
Pune : गुरुवारचा सूर्योदय हा खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) वाटचालीत एका ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार ठरला. पहाटेच्या गुलाबी थंडीत बिगूल वाजल्यानंतर ‘एनडीए’तील ‘क्वाटर डेक’चा दरवाजा उघडला अन् विविध सुरावटींच्या तालावर संचलन करत खेत्रपाल मैदानावर लष्करी बँडचे आगमन झाले.
त्यापाठोपाठ सुरू झालेल्या छात्रांच्या शिस्तबद्ध संचलनाने एका ऐतिहासिक घटनेची नोंद केली. ‘एनडीए’च्या ७५ वर्षांच्या वाटचालीत प्रथमच मुलींची बटालियन दीक्षान्त संचलनात सहभाग झाली. ज्याची दखल खुद्द राष्ट्रपतींनी घेत, ही घटना ऐतिहासिक असल्याचे जाहीर केले.
|
Kolhapur News : कोल्हापुरात केएमटी कर्मचाऱ्यांचा संप; बस सेवा ठप्प |
मैदानावर लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आगमनानंतर राज्यपाल रमेश बैस यांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर रुबाबदार घोड्यांच्या शानदार बग्गीमधून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे खेत्रपाल मैदानावर आगमन झाले.
छात्रांची मानवंदना स्वीकारत त्यांनी लष्करी वाहनातून संचलनाची पाहणी केली. यानंतर पदवी प्राप्त केलेल्या आणि दुसऱ्या वर्षातील कॅडेटनी दिमाखदार संचलन करत प्रशिक्षणातील उत्तुंग कामगिरी दाखवून दिली. त्यात १५ महिला छात्रांच्या संचलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
अखेर तीन वर्षे प्रबोधिनीतील खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर छात्रांनी पुढील प्रशिक्षणासाठी प्रबोधिनीतील ‘अंतिम पग’ ओलांडत जल्लोष केला. चेतक हेलिकॉप्टर, जॅग्वार आणि सुखोई या लढाऊ विमानांनी दिलेली सलामी सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले.
समारंभाला सरसेनाध्यक्ष अनिल चौहान, लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे लेफ्टनंट जनरल अजयकुमार सिंह, एनडीए कमांडंट व्हॉइस ॲडमिरल अजय कोचर, चीफ इन्स्ट्रक्टर संजीव डोग्रा उपस्थित होते. १४५व्या तुकडीत एकूण ३५३ छात्रांनी यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण केले
करिअरसाठी महिलांचा आजही संघर्ष
महिलांना आजही त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याबद्दल राष्ट्रपती मुर्मू यांनी खेद व्यक्त केला. त्या म्हणाल्या, ‘‘यशस्वीपणे प्रशिक्षण पूर्ण करणारे छात्र पाहून मला आनंद होत आहे.
‘एनडीए’त सन २०२२ पासून महिलांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली. आज प्रथमच संचलनात मुली सहभागी झाल्या, ही ऐतिहासिक बाब आहे. महिला छात्रांना प्रशिक्षणातील अनुभव पुढील करिअरमध्ये उपयोगी पडेल. बदलत्या युगानुसार नवीन युद्धनीती आणि नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे आवश्यक आहे.
राष्ट्रपतींच्या हस्ते पदक
उत्कृष्ट कामगिरी करणारे कॅडेट प्रथम सिंग यास सुवर्णपदक, कॅडेट जतिन कुमार यास रौप्यपदक आणि कॅडेट हर्षवर्धन भोसले यास ब्राँझपदक देऊन राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. ‘चीफ ऑफ स्टाफ बॅनर’ सन्मान ज्युलियन स्क्वाड्रन हेमंत कुमार यांनी स्वीकारला.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती




























Subscribe to my channel


