Pune : पुण्याच्या मुळशीतील व्यक्तीनं आयुष्य संपवलं, पडिक इमारतीत लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

Pune : पुण्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुणे-सातारा महामार्गाजवळ असणाऱ्या कापूरहोळ येथील एका पडीक इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर एका व्यक्तीचा मृतहेद आढळून आला आहे. या व्यक्तीने गळफास घेत आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कापूरहोळ परिसरातील काहीजणांना तेथील पडीक इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर एका व्यक्तीचा मृतदेह दिसला. हा मृतदेह नायलॉनच्या दोरीच्या साहाय्याने इमारतीवर लटकत होता. मृतदेह दिसल्यानंतर प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांनी घटनेची माहिती दिली. त्यानंतर स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले.

 

नायलॉनच्या दोरीने गळफास घेत आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली आहे. संबंधित व्यक्तीच्या खिशात आधार कार्ड सापडले असून त्यावरुन त्या व्यक्तीचे नाव आणि इतर माहिती मिळाली आहे. गणेश प्रकाश भोकरे (वय ४३) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. हा व्यक्ती मुळशी तालुक्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. भोरच्या राजगड पोलीस स्टेशनकडून घटनेचा पुढील तपास सुरु आहे.

पुण्यात पुन्हा हाणामारी

कार पार्किंगच्या वादातून एका तरुणाला १० ते १२ जणांनी बेदम मारहाण केली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. फिर्यादी तरुणाच्या तक्रारीनंतर मारहाण प्रकरणात पर्वती पोलीस स्टेशनमध्ये नऊ जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी तरुण आणि मारहाण करणारे एकाच इमारतीत राहतात. मागील काही दिवसांपासून त्यांच्यामध्ये पार्किंगवरुन वाद होता. यावरुनच तरुणाला मारहाण झाल्याचे म्हटले जात आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *