Pune : 'बाटलीतील पाणी पी नाही तर...' धर्मगुरू अन् नणंदेकडून ख्रिश्चन धर्मांतरासाठी दबाव, शिवीगाळ अन् मारहाण करत..

 

Pune : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी विवाहितेवर तिच्या नणंदेसह एका धर्मगुरूकडून जबरदस्ती केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ख्रिश्चन धर्म स्वीकारत नसल्यामुळे नणंदेनं महिलेला मारहाण केली. तसेच धर्मगुरूंनी तिला धमकी दिली. याच त्रासाला कंटाळून अखेर महिलेनं पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीनुसार, १९ वर्षीय पीडित महिलेच्या नणंदेनं विवाहितेवर ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकला होता. जेव्हा विवाहित महिलेनं नकार दिला, तेव्हा महिलेला मारहाण करण्यात आली होती. तसेच नणंदेनं शिवीगाळ केली.

या प्रकरणात फ्रान्सिस नावाच्या व्यक्तीने विवाहितेला धर्मांतरासाठी दबाव टाकला होता. 'मी बाटलीतून आणलेले पाणी प्यायले नाहीस..धर्म स्वीकारला नाहीस तर तुझ्याविरुद्ध पोलिसात खोटी तक्रार दाखल केली जाईल', अशी धमकी धर्मगुरूंनी दिली होती. वारंवार धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात येत होता.

पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय

पुण्यातील उच्चभ्रू मानल्या जाणाऱ्या बाणेर आणि विमानतळ परिसरात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण १८ तरुणींची सुटका करण्यात आली असून, त्यापैकी १० हून अधिक परदेशी नागरिक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

परिमंडळ ४ अंतर्गत विमानतळ पोलिसांनी साई अपेक्स इमारतीतील 'मेन्शन स्पा सेंटर'वर छापा टाकून १६ तरुणींची सुटका केली. यात १० परदेशी तरुणींचा समावेश आहे. या प्रकरणी स्पा सेंटरचा मालक, व्यवस्थापक आणि जागेचा मालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, दुसऱ्या कारवाईत बाणेर परिसरातील एका स्पा सेंटरवर छापा टाकून २ तरुणींची सुटका करण्यात आली आहे. या ठिकाणीही मालक आणि मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

 

 

 

 

 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *