Pune : दारूच्या नशेत कार थेट बसस्टॉपवर चढवली, पुण्यातील धक्कादायक प्रकार

Pune : सदाशिव पेठमध्ये दारूच्या नशेत १२ जणांना उडल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक अशीच घटना समोर आली आहे. दारूच्या नशेत एका चालकाने गाडी थेट बस स्टॉपमध्ये चढवल्याची धक्कादायक घटना पुण्यातील भापकर पेट्रोल पंपाजवळ घडली. ही घटना तीन दिवसांपूर्वी घडली असून, याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सुदैवाने, या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.

पर्वती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चालक गणेश जेवे याच्याविरुद्ध दारू पिऊन वाहन चालवल्याचा (ड्रिंक अँड ड्राइव्ह) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले असून, त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. चालकाने दारूचे सेवन केल्याचे स्पष्ट झाले. ही घटना रात्रीच्या वेळी घडली, ज्यामुळे बस स्टॉपवर फारशी गर्दी नव्हती. पोलिसांनी नागरिकांना दारू पिऊन वाहन न चालवण्याचे आवाहन केले आहे.

Thane News : ठाण्यातून संशयास्पद हालचाली, महाराष्ट्र एटीएसची पडघामध्ये धाड, साकिब नाचनच्या घराची झडती

मिळालेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार ३० मे रोजी रात्री ११ वाजता पुणे सातारा रस्त्यावरील पंचमी चौकाजवळ भापकर पेट्रोल बस स्टॉपवर घडला. कारचालक गणेश गोरख जेवे हा त्याच्या ताब्यातील (MH12 KT 4764) गाडी दारू पिऊन चालवत होता. अचानक त्याचे गाडीवरचे नियंत्रण सुटले आणि त्याने थेट गाडी बस स्टॉपवर चढवली. सुदैवाने रात्रीची वेळ असल्याने तिथे प्रवासी नव्हते म्हणून अनर्थ टळला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत चालकाला ताब्यात घेतले. पोलिसांनी वाहन ताब्यात घेऊन चालकाचा परवाना रद्द करण्यासाठी अहवाल अहवाल पाठवला आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply